शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातील ‘नोकरी रॅकेट’ उघड

By admin | Updated: November 10, 2014 03:55 IST

बेरोजगारांना मंत्रालय, वखार महामंडळात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणारे रॅकेट अखेर पोलिसांनी उघड केले आहे

अहमदनगर : बेरोजगारांना मंत्रालय, वखार महामंडळात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणारे रॅकेट अखेर पोलिसांनी उघड केले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.मंत्रालयात नियुक्ती दिल्याचे बनावट लेटर पॅड वापरून फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमधील आणखी काही आरोपी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.नगर येथील भाऊसाहेब नाथा शेळके (रा. वाघोली, ता. शेवगाव) यांनी ३ नोव्हेंबरला दिलेल्या फिर्यादीनुसार उषा मोहन मुंडे (रा. रेल्वे स्टेशन रोड) यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मुंडे यांना पहिल्याच दिवशी अटक झाली होती. त्यांनी काही आरोपींची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोनच दिवसांत प्रकरणाचा पर्दाफाश करीत आणखी तीन आरोपींना अटक केली. राहुल गुलाबराव खामकर (रा. चांदेली, जि. सातारा), दत्तात्रय सदाशिव धापटे (रा. लांडेनगर, पुणे) जॉन पिटर एरीक (पिंपळे सौदागर, पुणे) यांना पुणे, सातारा येथून अटक केली. पाचवा आरोपी असिफ सय्यद फरार आहे.चारही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. असिस्टंट व क्लार्क पदावर नियुक्ती झाल्याचे बनावट नियुक्ती पत्र आरोपी तयार करीत होते. त्यांनी ही पत्रे कुठे तयार केली, याची माहिती अद्याप लागलेली नाही. त्यांनी आणखी काही साथीदारांची नावे सांगितली आहेत. मात्र त्यांची नावे अपूर्ण असल्याने त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ते साथीदारही पुणे व सांगली जिल्ह्यातील आहेत. मुंडे यांनी घेतलेले साडेतीन लाख रुपये सर्वांनी समान वाटप करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रकरणातील साक्षीदार सतीश विश्वास खरड यांनी बनावट नियुक्तीपत्राची प्रत पोलिसांना दिली आहे. त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतरच या रॅकेटमधील आणखी फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)