शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

महापौर बंगल्याचे प्रवेशद्वार सामान्यांसाठी खुले करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 04:39 IST

महापौर बंगल्याची शोभा वाढवण्यावण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने महापौर बंगल्याच्या शेजारील सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण केले

मुंबई : महापौर बंगल्याची शोभा वाढवण्यावण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने महापौर बंगल्याच्या शेजारील सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण केले. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता महापालिकेने महापौरांसाठी या भूखंडावर उद्यान उभारले.मात्र उच्च न्यायालयाने महापालिकेला याबाबत चांगलेच फटकारत तातडीने महापौर बंगल्याचे प्रवेशद्वारे उघडे करून हा बगीचा सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे निर्देश महापालिकेला दिले.नवी मुंबई महापालिकेने महापौरांच्या बंगल्यासाठी सिडकोकडून सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल येथील भूखंड संपादित केला. महापौरांच्या बंगल्याची शोभा वाढावी यासाठी बंगल्याच्या आजुबाजूच्या भूखंडावर खासगी उद्यानही उभारले.मात्र हे उद्यान सिडकोच्या भूखंडांवर अतिक्रमण करून उभारण्यात आले. महापालिकेने सिडकोकडून कायदेशीररीत्या भूखंड संपादित केला नाही. सार्वजनिक उद्यानाच्या नावाखाली हे उद्यान केवळ महापौरांकरिताच करण्यात आले, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. हिमांशु केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर होती.‘महापौर बंगल्याच्या प्रवेशद्वारातूनच उद्यानात जाता येते आणि महापौर बंगल्याचे प्रवेशद्वार बंद असते. त्यामुळे सामान्यांना या उद्यानात जाता येत नाही,’ असे संदीप ठाकूर यांनी खंडपीठाला सांगितले.त्यावर खंडपीठाने महापालिकेला चांगलेच फटकारले. ‘सिडकोच्या भूखंडावर तुम्ही अतिक्रमण कसे करू शकता? सार्वजनिक उद्यानाच्या नावाखाली हे उद्यान केवळ एका व्यक्तीसाठी बांधण्यात आले आहे. त्यामुळे महापौर बंगल्याचे प्रवेशद्वारे खुले करून सामान्यांना या उद्यानात प्रवेश द्या. अन्यथा सिडको त्यांना वाटेल ते करण्यास मोकळी आहे,’ असे म्हणत खंडपीठाने महापालिकेला दोन आठवड्यांत उद्यानासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार सुरू करणार की नाही, याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी) >शुक्रवारच्या सुनावणीत महापालिकेने हे उद्यान सार्वजनिक असल्याचा दावा केला. मात्र संदीप ठाकूर यांनी याठिकाणी सामान्यांना प्रवेश नसल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणली.ही सुनावणी न्या. हिमांशु केमकर व कर्णिक यांच्या खंडपीठासमोर होती.