शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे समाधान झाले तरच ‘समृद्धी’

By admin | Updated: July 16, 2017 01:05 IST

शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाले आहे तिथेच समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेतल्या जात आहेत पण, शेतकऱ्यांचा विरोध असेल तिथे शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाले आहे तिथेच समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेतल्या जात आहेत पण, शेतकऱ्यांचा विरोध असेल तिथे शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्र परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेने आधी या महामार्गाला विरोध केला होता. मात्र, सार्वजनिक उपक्रम मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात जाऊन तेथे शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी चेक दिल्याने शिवसेनेच्या भूमिकेवर विरोधकांनी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, ठाकरे यांनी शनिवारी पत्र परिषद घेतली. शिंदे हेही तेव्हा उपस्थित होते.महामार्गासाठी सुपीक जमीन घेता कामा नये. शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झालेच पाहिजे, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे व त्यासाठी आम्ही सरकारला विरोध करू. महामार्गासाठी सुपीक जमीन जाऊ देणार नाही. तसेच योग्य मोबदला मिळतो की नाही याची खबरदारी आम्ही घेऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यापूर्वी एखादा प्रकल्प मंत्रिमंडळाने मंजूर केला की सरकारी अधिकारीच तो पुढे रेटत असत. मात्र आता एकनाथ शिंदे असतील वा शिवसेनेचे इतर मंत्री असतील ते प्रत्यक्ष जाऊन सर्व संबंधितांशी चर्चा करत आहेत. कोणाचे आक्षेप असतील तर ते ऐकून घेत आहेत. हे कदाचित प्रथमच घडत असेल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीच काळजी शिवसेनेचे मंत्री घेत आहेत. पहिल्या युती सरकारच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग झाला. तेव्हाही काही जणांचा विरोध होता. मात्र सर्वांचे समाधान झाल्यानंतरच सरकार पुढे गेले.आता सर्वांचे समाधान होत असेल तरच हा महामार्ग होईल. विकास करताना वा कोणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.शेतकरी स्वत:हून आले : शिंदेसुपीक जमिनी वाचवूनही हा महामार्ग होऊ शकतो. त्याबाबत मंत्री, अधिकारी व संबंधित शेतकऱ्यांची चर्चा केली जाईल आणि त्यातून आलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, नागपूरनजीक हिंगणा येथे भूसंपादनासाठी शेतकरी शुक्रवारी स्वत:हून समोर आले. त्यांना कोणीही जबरदस्ती केलेली नव्हती.