शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

सरसकट कर्जमाफी हाच एकमेव निकष : पवारांनी केले घोषणेचे विश्लेषण

By admin | Updated: June 11, 2017 22:01 IST

राज्य शासनाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु निकषांवर आणि तत्वत: कर्जमाफी असा उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 11 -  राज्य शासनाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु निकषांवर आणि तत्वत: कर्जमाफी असा उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे काळजी वाटते. कर्जमाफीसाठी एकच निकष असावा ते म्हणजे सरसकट कर्जमाफी. निकष, तत्वत: याचे विश्लेषण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आता येऊ नये. घोषणेतील तत्वत: आणि निकष या दोन शब्दांवरून माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी सरकारचा कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. सातबारा कोरा करण्यासाठी शासनाने तातडीने महसूल विभागाला आदेशित करण्याची मागणी करीत त्यांनी शासन व सुकाणू समितीचे अभिनंदन केले. सरकारच्या घोषणेच्या अंमलबजावणीवर सुकाणू समितीने, शेतकऱ्यांनी, संघटनांनी लक्ष ठेवावे असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,आ.सतीश चव्हाण, अमरसिंंह पंडीत, भाऊसााहेब चिकटगांवर, अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती. पावसाळा लागला आहे, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी नवीन कर्जासाठी सहकारी सोसाट्यांकडे जाऊन कर्ज पदरात पाडून घ्यावे. भरपूर शेती उत्पादन घेण्याचे आवाहन करीत माजीमंत्री पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे अल्प आणि दीर्घ मुदतीचे कर्ज असते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची सुकाणू समितीची मागणी होती. सरकारने काय निर्णय घेतला आहे, त्याची प्रत सध्या उपलब्ध नाहीये. राज्यातील शेतकऱ्यांची ऐतिहासिक संप झाला. सर्व शेतकरी संघटना, नेत्यांची एकजुट यामुळे झाली. हे शेतकरी आंदोलनाचे यश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्यांना लाभ मिळतो. परंतु मराठवाडा, विदर्भ व इतर सर्व भाग हे राज्याचे आहेत. त्यामुळे सरसकट या शब्दाचा अर्थ सर्वांना असा होतो हे मला लहानपासून कळते. असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावर बोलतांना सांगितले. सरकारने निर्णय घेतला म्हणजे आर्थिक तरतूदीचा विचार केलाच असेल. डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे, हमीभावाची अंमलबजावणी झाली तर शेतकरी आणखी समाधानी होतील. राजकीय भूकंप त्यांनाच माहितीराजकीय भूकंपाचे वक्तव्य शिवसेनेच्या मुखपत्राने केले आहे. त्यामुळे त्याचा केंद्रबिंदूही तेथेच असेल. त्याबाबत मला काहीही माहिती नाही. भूकंपांच्या मागील निश्चित कारणे त्यांनाच माहिती असतील. पंतप्रधानाची भेट आणि त्यानंतर कर्जमाफीचा सरकारचा निर्णय, यामागे पवार आहेत काय? माझ्या भेटीमुळे नाही, तर शेतकरी आणि सुकाणू समितीचे हे यश आहे. असे पवारांनी स्पष्ट केले.