शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अस्वस्थ करणाऱ्या हिंसक वातावरणावर लेखकच उत्तर शोधतील- डॉ. भालचंद्र नेमाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 02:40 IST

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे साहित्य आणि कला पुरस्कारांचे वितरण

जळगाव : राज्यात वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे मुली, स्त्रियांना वाईट दिवस आले आहेत. एवढे समाजशास्त्रज्ञ असूनदेखील यावर उपाय कसा सापडत नाही, असा रोखठोक प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जळगावात उपस्थित केला. देशात, राज्यात जाती-धर्माच्या नावावर वाढणारी अस्वस्थता, महिलांवरील अत्याचार, वाढती स्त्री भ्रूण हत्या या सारख्या हिंसक वातावरणावर केवळ लेखकच उत्तर शोधू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या स्मृतिदिनी जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाºया साहित्य आणि कला पुरस्कारांचे वितरण मंगळवारी सायंकाळी जैन हिल्सवरील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात झाले. डॉ. नेमाडे अध्यक्षस्थानी होते.डॉ. नेमाडे यांच्यासह उद्््घाटक म्हणून कविवर्य ना. धों. महानोर, प्रमुख अतिथी म्हणून संघपती दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, पुरस्कार्थी शिल्पकार राम सुतार, मेघना पेठे, अजय कांडर, रफिक सूरज उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मराठा बाणा निर्माण करणाºया मलिकांबर ज्या धर्माचा होता त्याच मुस्लीम धर्मीय बांधवांना देशात अस्वस्थ वाटणे म्हणजे आपल्याला लाज वाटण्यासारखा प्रकार आहे, असे परखड मत डॉ. नेमाडे यांनी सध्याच्या परिस्थितीवर व्यक्त केले.कायदाच असा हवा की, स्त्रियांच्या शीलावर अतिक्रमण होत असेल तर तिने संबंधितांना मारुन टाकावे. त्यामुळे अशा घटनांना आळा बसू शकेल. पूर्वी घरात महिलांची संख्या अधिक असायची. आम्हीदेखील महिलांसोबत वाढलो. मात्र आज स्त्रियांचीच संख्या कमी झाली आहे. सुशिक्षित, श्रीमंतांमध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत असून हा प्रकार कधी आदिवासी बांधवांमध्ये सापडणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले.सध्या महिलांवरील अत्याचाराचे मूळ म्हणजे मुलींची कमी होणारी संख्या असून कायदा सुव्यवस्थेसह पोलीस, सैन्य दलात महिलांना अग्रक्रमाने स्थान दिले पाहिजे, असेही त्यांनी सुचविले.पुरस्कार विजेतेभवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पहिला व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार (गोंदूर, धुळे) यांना देण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी मेघना पेठे (बाणेर-पुणे), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अजय कांडर (कणकवली, जि.सिंधुदुर्ग) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी रफिक सूरज (हुपरी, जि. कोल्हापूर) यांना वितरीत करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि ग्रंथसंपदा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.रोखठोकडॉ. भालचंद्र नेमाडेमुस्लीम बांधवांना अस्वस्थ वाटणे सर्वांसाठी लाज वाटणारा प्रकारमहिलांच्या शीलावर अतिक्रमण झाल्यास मारुन टाकावे, असा कायदा हवासुशिक्षितांमध्ये वाढतेय स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण