शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत वाढले केवळ चार लाख विद्यार्थी

By admin | Updated: December 18, 2015 01:14 IST

मोठा गाजावाजा करून राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत, सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत नाममात्र भर पडली आहे.

नवी दिल्ली : मोठा गाजावाजा करून राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत, सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत नाममात्र भर पडली आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण देशात गेल्या चार वर्षांत केवळ १ कोटी १० लाख मुलांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला. याच काळात महाराष्ट्रात केवळ चार लाख मुले सरकारी शाळांशी जोडली गेली.राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २००९-१० मध्ये प्राथमिकस्तरावर १८.७९ कोटी विद्यार्थी होते. २०१३-१४ मध्ये यांची संख्या वाढून १९.८९ कोटी झाली. याचा अर्थ केवळ १ कोटी १० लाख मुलांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला. महाराष्ट्रात सन २००९-१० मध्ये सरकारी शाळांमध्ये १.५८ कोटी विद्यार्थी होते. चार वर्षांनंतर ही संख्या वाढून १ कोटी ६२ लाख झाली, म्हणजेच चार वर्षांत केवळ चार लाख विद्यार्थ्यांची भर पडली. (प्रतिनिधी)शाळांतील सुविधांविषयी सरकारचे दावेसर्व शिक्षा अभियानांतर्गत २०००-०१ पासून चालू वर्षाच्या सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व राज्यांमध्ये ३ लाख ११ हजार शाळा इमारती, १८ लाख ६१ हजार अतिरिक्त वर्गखोल्या आणि १० लाख १४ हजार शौचालये मंजूर केली गेली. यापैकी १८,२२२ शाळा इमारती, ७८,८८७ अतिरिक्त वर्गखोल्या आणि ३२,९४० शौचालयांना स्वीकृती दिली गेली. २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ शाळा’अंतर्गत २ लाख ६१ हजार ४०० शाळांमध्ये ४ लाख १७ हजार ७९६ शौचालये बांधण्यात आली. मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालये असावीत, हेही निश्चित करण्यात आले. यूडीआयएसआयनुसार संपूर्ण देशात २०१३-१४ मध्ये १४ हजार १३४ शाळांना स्वत:ची इमारत नाही. यात महाराष्ट्रातील १८२ शाळांचा समावेश आहे. तूर्तास या शाळा अस्थायी ठिकाणी भरवल्या जातात. सर्व शिक्षा अभियान सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत, असा दावा सरकारने केला.