शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात अवघ्या २९ हजार परवान्यांचे नूतनीकरण

By admin | Updated: December 19, 2015 02:20 IST

विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेऊन त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई : विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेऊन त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. परवाना नूतनीकरणाला चार वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही अवघ्या २९ हजार ४५0 रिक्षा परवान्यांचेच नूतनीकरण झाल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ रिक्षा परवाने विविध कारणास्तव रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात २0 हजार आणि इतर क्षेत्रामध्ये १५ हजार सहमत शुल्क आकारण्यात आले. १ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर तब्बल चार वेळा मुदतवाढ नूतनीकरणासाठी देण्यात आली. १५ डिसेंबर ही शेवटची मुदतवाढ देऊनही परिवहन विभागाच्या आवाहनाला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ डिसेंबरपर्यंत २९ हजार ४५0 परवान्यांचेच नूतनीकरण झाले. या नूतनीकरणासाठी सहमत शुल्क आकारण्यात आल्याने यातून एकूण ४५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. शेवटची मुदतवाढ देतानाच नूतनीकरण करण्यात येणारे परवाने कायमचे रद्द करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परवाना फेरवाटपाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून वाढीव मुदतीत ज्यांनी परवाना नूतनीकरण केले नाही, तसेच यापूर्वी ज्यांनी रिक्षा परवाना धारण केला आहे अशा परवानाधारकांना प्रस्तावित लॉटरी प्रक्रियेत भाग घेता येणार नसल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आले होते. अंतिम मुदत संपली३१ आॅक्टोबरपर्यंत परवाना नूतनीकरणाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबर आणि पुन्हा ३0 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने १५ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती.