शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लाखावर नागरिकांची सुरक्षा केवळ २२ पोलिसांच्या हाती

By admin | Updated: June 7, 2014 22:51 IST

६४ गावे असून १ लाखाच्या वर लोकसंख्या आहे. एवढया मोठया जनतेचे संरक्षण करण्यासाठी आज रोजी केवळ २२ पोलिस कर्मचारी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. १

शिरपूर जैन : येथील पोलिस स्टेशन हे इंग्रज कालीन असून या पोलिस स्टेशन अंतर्गत ६४ गावे असून १ लाखाच्या वर लोकसंख्या आहे. एवढया मोठया जनतेचे संरक्षण करण्यासाठी आज रोजी केवळ २२ पोलिस कर्मचारी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. १0 पोलिस कॉन्स्टेबल व ४ पोलिस हेड कॉन्स्टेबल ची कमतरता असल्याने या २२ कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. बुलडाणा जिल्हयाच्या सिमेपर्यंत हद्द असलेल्या शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत ६४ गावांचा समावेश असून लाखो नागरीक या गावामध्ये वास्तव्यास आहेत. पोलिस स्टेशनची हद्द मोठी असल्याने येथे १ पोलीस निरिक्षक, १ पोलीस उप निरिक्षक व ३८ पोलिस कर्मचारी असणे आवयक आहे. परंतु मागील काही वर्षापासून येथे पोलिस कर्मचार्‍यांची सतत कमरता आहे. सध्या स्थितीत येथे १0 पोलिस कॉन्स्टेबल, ४ पोलीस हेड कॉन्स्टेबल. व इतर ४ कर्मचारी रजा अथवा इतर पोलिस कार्यालयात कर्तव्यावर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे ६४ गावातील लाखाच्यावर नागरिकांची सुरक्षा केवळ २२ कर्मचरी करताना दिसून येत आहेत. यामुळे कर्तव्यावर उपस्थित २२ पोलिस कर्मचार्‍यांच्या कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. अशातच शिरपूर पोलिस स्टेशन आवारात असलेल्या निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था झाल्याने त्यांना गावांमध्ये भाडयांच्या खोलीत रहावे लागत आहे.