शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे अन् तूर डाळीचा वर्षाव!

By admin | Updated: March 8, 2017 01:19 IST

खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अचानक विधानभवनासमोर येऊन मंत्री,आमदारांच्या गाड्यांवर कांदे आणि तूरडाळ फेकली.

मुंबई : खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अचानक विधानभवनासमोर येऊन मंत्री,आमदारांच्या गाड्यांवर कांदे आणि तूरडाळ फेकली. दोन्हींचा काही मिनिटांतच सडा पडला. पणन राज्यमंत्री आणि संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. शेतमालाला योग्य भाव नाही, शेतकऱ्यांची दुर्दशा झाली असल्याचे सांगत या कार्यकर्त्यांनी सकाळी पावणेअकराच्या सुमारास हे आंदोलन केले. त्यावेळी मंत्री, आमदार अधिवेशनासाठी गाड्यांनी विधानभवनात जात होते. त्याचवेळी गनिमीकावा वापरत खा.शेट्टी आणि वीस-पंचवीस कार्यकर्ते अचानक समोर आले आणि त्यांनी कांदे व तूरडाळा गाड्यांवर आणि सुरक्षेसाठी उभारलेल्या विधानभवनाच्या गेटसमोर कांदा व तूरडाळ फेकणे सुरू केले आणि शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या तडाख्यातून सदाभाऊ खोत यांची गाडीही सुटली नाही. या गेटवर एकच गोंधळ उडाला. त्या ठिकाणी असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. शेवटी खा.शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. गेले काही दिवस खा.शेट्टी आणि खोत यांच्यात विसंवादाचे वातावरण आहे. त्याचा परिणाम म्हणून तर खोत यांच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले नाही ना अशी चर्चा विधानभवन परिसरात होती. भाजपाच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी असलो तरी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कशाचीही तमा बाळगणार नाही. प्रसंगी सत्तेतून बाहेर पडू, असे खा.शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले. स्वत: खोत यांनी पत्रकारांशी बोलताना आजच्या आंदोलनाचे समर्थन केले. त्याचवेळी आमचे सरकार शेतमालाला योग्य भाव देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे आणि त्या संदर्भात अजूनही निर्णय घेईल, असे ते म्हणाले.