शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला मार्च महिन्यात मिळणार प्रतिक्विंटल दोन हजार रुपये दर!

By admin | Updated: November 11, 2015 01:14 IST

कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी आणि केंद्रीय कृषी विपणनचा अंदाज.

अकोला: येत्या मार्च २0१६ मध्ये कांदा या भाजीपाला पिकाला प्रतिक्विंटल १९00 ते २000 रुपये दर मिळण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग व दिल्ली येथील केंद्रीय कृषी विपणन केंद्राने वर्तविली आहे.कांदा उत्पादनात भारत हा जगात दुसर्‍या क्रमांकावर असून, भारतातील कांद्याला मलेशिया, बांग्लादेश, युनायटेड अरब अमिरात, श्रीलंका, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशात खूप मागणी आहे. भारतात कांदा उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून, उत्पादनातील वाटा २७ टक्के (४५.४६ दशलक्ष टन) एवढा आहे. या राज्यात कांदा पिकाखालील क्षेत्र हे ४.६६ दशलक्ष हेक्टर आहे. महाराष्ट्राखेरीज कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, तामिळनाडू, राजस्थान आणि हरियाणा कांदा उत्पादन घेणारे हे महत्त्वाचे राज्य आहे. राष्ट्रीय बागायती संशोधन व विकास संशोधनानुसार महाराष्ट्रात २0१४-१५ मध्ये कांदा लागवडीखालील क्षेत्र ११.८0 दशलक्ष हेक्टर होते. तर उत्पादन १८९२३ दशलक्ष टन होते. २0१३-१४ मध्ये हेच क्षेत्र १२.0३ दशलक्ष हेक्टर होते, तर उत्पादन १९४.0१ दशलक्ष टन एवढे होते.दरम्यान, यावर्षी अपेक्षित कांद्याचे उत्पन्न व किमतीचा कल या सर्व गोष्टींचा विचार करू न अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र धोरण संशोधन केंद्र व नवी दिल्ली येथील कृषी विपणन केंद्राच्या चमूने कांदा या पिकाच्या नाशिक जिल्हय़ातील लासलगाव बाजारपेठेतील मागील ११ वर्षांच्या कालावधीतील मासिक सरासरी किमतीचे पृथक्करण केले असून, या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार बाजारातील चालू किमती कायम राहिल्यास सामान्य हवामानात वेगवेगळ्य़ा प्रतवारीनुसार येणार्‍या मार्च २0१६ मध्ये कांद्याची सरासरी किंमत प्रतिक्विंटल १९00 ते २000 रुपये राहण्याची शक्यता आहे; परंतु आयात-निर्यात धोरणात झालेले बदल, तसेच सद्य:स्थितीत हवामानात होणार्‍या बदलाचा परिणाम कांद्याच्या किमतीवर होऊ शकतो. खरीप कांद्याला येत्या नोव्हेंबर महिन्यात १९00 ते २000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची शक्यता आहे; परंतु आयात-निर्यात धोरणात झालेले बदल, तसेच सद्य:स्थितीत हवामानात होणार्‍या बदलाचा परिणाम कांद्याच्या किमतीवर होऊ शकतो. या माहितीमुळे पीक पेरणीचा व निविष्ठा वापराचा योग्य निर्णय शेतकर्‍यांना घेता येत असल्याचे कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र देशमुख यांनी सांगीतले.