शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला हमीभाव हवाच

By admin | Updated: September 5, 2016 01:41 IST

कांद्याला देशात बाजारभाव वाढले, तेव्हा सरकारने परदेशातून ४५ रुपये किलोने कांदा आणला.

ओतूर : कांद्याला देशात बाजारभाव वाढले, तेव्हा सरकारने परदेशातून ४५ रुपये किलोने कांदा आणला. दुसऱ्या देशाप्रमाणे आयात केलेल्या कांद्याच्या दराने म्हणजेच ४५ रुपये प्रतिकिलो कांद्याला भाव वा हमीभाव ठरवून द्या. ऊस, दूध यांचेही भाव शेतकऱ्यांना वाढवून द्या, तसे न केल्यास आळेफाटा (ता. जुन्नर) येथे भव्य असा रास्ता रोको करू. हा रास्ता रोको १२ सप्टेंबरला होणार आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.शेतकरी नेते, दिवंगत शरद जोशी यांच्या जयंतीच्या निमित्ताने ओतूर (ता. जुन्नर) जवळील नंदलाल लॉन्स येथे ३ सप्टेंबरला दुपारी राज्यस्तरीय कांदा, ऊस, दूध परिषद आयोजित केली होती. या परिषदेसाठी बारामती, मराठवाडा, नाशिक, सांगली, सातारा, पंढरपूर, सोलापूर, खेड, मंचर, चाकण, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या परिषदेसाठी गजानन राजबिंडे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नामखिळे, पुणे जिल्हा अध्यक्ष लक्षमण शिंदे, राष्ट्रवादीचे राज्य युवा उपाध्यक्ष अतुल बेनके, शंकरराव गायकवाड, दिलीप डुंबरे, बाळासाहेब घुले, दिनकर दाभाडे (विदर्भ), तानाजी बेनके, अशोक पराडे, श्रीमती ताजणे, संभाजी पोखरकर, अंबादास हांडे, संजय भुजबळ, मीनाक्षी ताजवे आदी मान्यवर व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करून शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या परिषदेच्या निमित्ताने ओतूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. त्या रॅलीत हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या निमित्ताने संजय भुजबळ (तालुका अध्यक्ष), श्रीपती ताजवे, दिलीप डुंबरे, शंकरराव गायकवाड, लक्ष्मण शिंदे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. आंदोलनात राज्यभरातून हजारो शेतकरी सहभागी होऊ नयेत, असे वाटत असेल, तर कांद्यावरची निर्यात बंदी कायमचीच उठवावी. कांद्याला हमीभाव द्या, अशी मागणी पाटील यांनी केली.क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नामखिळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे सरकार व शेतकरी संघटनेचा माणूस निवडून दिला; पण हे सर्वजण दरोडेखोर निघाले, अशी घणाघाती टीका करून कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. उसाचे लेव्ही साखर धोरण दुधाचा भाव याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पाण्याची बाटली २० रुपयाला, मग शेतकऱ्याच्या दुधाला ४० रु. प्रतिलिटर भाव द्या. त्यांचे वीजबिले भरली जात नाही, कारण, मोफत वीज घोषणेचे काय झाले, कांद्याला जीवनाश्यक वस्तूत टाका अशी मागणी या परिषदेत झाली.सर्व उपस्थितांनी शेतकरी संघटनेची शपथ घेतली. संजय भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. उमेश देवकर यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मण शिंदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारभूत किंमत अधिक ५० टक्के नफा मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांवर वेगवेगळे कर बसवितात. यावर्षी कांद्याचे भाव पडले. कांदा नासला, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जोपर्यंत कांद्याची नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत आपण शासनाचा कोणताही कर भरावयाचा नाही, ही भूमिका आपणाला घ्यावी लागणार. गेली ३ वर्षे उसाचा भाव तोच आहे, कोणीही त्याविषयी बोलत नाही, फक्त शेतकरी संघटनाच बोलते. १२ सप्टेंबरच्या या रास्ता रोको आंदोलनात आम्ही कांद्याला हमीभाव मिळाल्याशिवाय जाणार नाही. - रघुनाथदादा पाटील