शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

एक योग ‘चार’ चा

By admin | Updated: October 31, 2014 00:52 IST

राजकारण आणि ज्योतिष्याचा योग नेहमी जुळून येतो! नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही ४ या आकड्याचा अनोखा योग घडून आला आहे. अंकतज्ञांनी फडणवीसांसाठी ४ आकडा लाभदायी असल्याचे सांगितले आहे.

अनपेक्षित यश देणारा आकडा : अंकतज्ज्ञांचे मत मंगेश व्यवहारे - नागपूर राजकारण आणि ज्योतिष्याचा योग नेहमी जुळून येतो! नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही ४ या आकड्याचा अनोखा योग घडून आला आहे. अंकतज्ञांनी फडणवीसांसाठी ४ आकडा लाभदायी असल्याचे सांगितले आहे. अंकशास्त्राच्या नियमानुसार ४ हा अंक मंगळ आणि राहूचे प्रतिनिधित्व करतो. मंगळ हा ग्रह प्रचंड ऊर्जा आणि धाडसाचे प्रतीक आहे. बहुतांश राजकारण्यांच्या कुंडलित मंगळाचे प्रभुत्व दिसून येते. शिवाय राहू हा ग्रह वारसांचा आशीर्वाद देऊन जातो. अनिश्चितेतून काहीतरी ठोस मिळवून देणारा ४ आकडा आहे. हा आकडा प्रभावी असणाऱ्या व्यक्तीला जीवनात खूप लवकर ब्रेक मिळतो. ही व्यक्ती प्रचंड मेहनती असते. त्यांची दूरदृष्टी सामान्य व्यक्तीपेक्षा काहीतरी वेगळी असते. ते आयुष्यात खूप प्रॅक्टीकल असतात. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही हे गुण दिसून येतात. सध्या त्यांच्यावर ४ आकड्याचे प्रभुत्व दिसून येत आहे. विशेष म्हणजे फडणवीसांचा जन्मदिनाचा आकडा २२ आहे. २२ ची बेरीज ४ येते. त्यांचा शपथविधी सोहळा ३१ ला आहे. याही आकड्याची बेरीज ४ येते. ते चौथ्यांदा आमदार बनले, सध्या ते ४४ वर्षाचे आहेत. योगायोगाने भाजपाला बहुमतसुद्धा १३ पर्यंत सिद्ध करायचे आहे. ही बेरीजही ४ येते. विशेष म्हणजे ते विदर्भातील चौथे मुख्यमंत्री होणार आहेत. हा चौकारांचा षटकार योगायोगाने का होईना त्यांच्या बाबतीत जुळून आलेला आहे. कदाचित मुख्यमंत्री बनण्यासाठी शुभांक ठरला आहे. कल्पनाशक्तीपेक्षा जास्त मिळवून देतो४ या आकड्याचे यश हे अनिश्चित असते. जसे अचानक लॉटरी लागणे म्हणता येईल. देवेंद्र फडणवीसांवर ४ चे प्रभुत्व असल्याने पक्षात ज्येष्ठ नेते असतानाही त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे. अशांना लवकर ब्रेक मिळतो. फडणवीस यांनाही महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री ही पदे अतिशय कमी वयात मिळाली आहे. निळा रंग हा त्यांच्यासाठी लकी असतो. त्यामुळे कदाचित शपथविधी सोहळ्यातही त्यांचा पेहरावा निळ्या रंगाचा राहू शकतो. पं. महेंद्रकुमार महाजन, अंकज्योतिष