शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे

By admin | Updated: May 10, 2015 00:56 IST

आपला देश ही आजमितीस जगातील एक अवाढव्य बाजारपेठ आहे. ती अर्थातच आपल्या अफाट लोकसंख्येमुळे आहे. ही लोकसंख्या हे आपलं बलस्थान ठरवू शकते.

अनिल काकोडकर,(लेखक अणुशास्त्रज्ञ व अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष) -

आपला देश ही आजमितीस जगातील एक अवाढव्य बाजारपेठ आहे. ती अर्थातच आपल्या अफाट लोकसंख्येमुळे आहे. ही लोकसंख्या हे आपलं बलस्थान ठरवू शकते. त्यासाठी लोकसंख्येचे रूपांतर प्रज्ञावान मनुष्यबळात करणे गरजेचे आहे. हे जे काही मिशन देशाच्या पुढ्यात आहे, त्याला योग्य धोरण आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाचे धोरण निरंतर एका विशिष्ट दिशेने कायम आणि सुसंगत राहणे अपेक्षित असते. तेच हितावहही आहे. विज्ञानाच्या प्रगतीचा देश आणि जग अशा दोन्ही पातळ््यांवर समाजाच्या हितासाठी वापर करणे आणि त्याचवेळी जगाच्या व्यासपीठावर भारताच्या नेतृत्वाची उंची वाढविणे असा दुहेरी हेतू आपल्या राष्ट्रीय धोरणाचा पाया राहिला आहे. आजवरचा अनुभव असा आहे, की सत्तांतर झाले म्हणजेच राजवट बदलली म्हणून या धोरणात कधी आमूलाग्र बदल झालेला नाही. नव्या सरकारनेही या बाबतीत कोलांटउडी मारणे अपेक्षित नाही. याचाच एक अर्थ असा, की आपला अणु कार्यक्रम आणि अंतराळ मोहिमांची दिशा कायम राहायला हवी. तसेच दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठीचे धोरणही तात्विकदृष्ट्या समान गाभ्याचे असणे अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून केंद्रातील नव्या सरकारच्या एक वर्षाच्या कारकीर्दीकडे पाहायला हवे. तसे पाहिले तर एक वर्षाचा कालावधी हा निर्णायक मतप्रदर्शनासाठी पुरेसा नाही. तरीही त्याचा धोरण आणि अंमल अशा दुहेरी मोजपट्टीवर ढोबळमानाने विचार करणे शक्य आहे.सध्याचे केंद्र सरकार दर्जेदार शिक्षणासाठी तसेच महिलांसाठी शिक्षणाच्या चांगल्या सोयी देण्यासाठी उत्सुक आहे. त्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णयही सरकारने घेतले आहेत. मुख्य म्हणजे शिक्षण आणि विकास यांच्यात सेतू उभारण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्तीही काही निर्णयातून प्रकट झाली आहे. उदाहरणच सांगायचे तर आयआयटीसारख्या संस्थांना प्रत्येकी दहा गावे दत्तक घेण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे तर एमआयटीनेही निदान पाच गावे अशा पद्धतीने दत्तक घेऊन विकासाची गंगा आणि शिक्षणाची गंगोत्री तेथवर पोहोचवण्याची अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. आपला प्रवास आता ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरु आहे. जगभरातील हायटेक कंपन्या तरुण प्रज्ञेच्या शोधात भारतात येत आहेत. या परिस्थितीत आपणही प्रज्ञाशोध आणि पर्याप्त वापर होत नसलेली ऊर्जामय युवा प्रज्ञा उपयोगात आणणे, हे मोठे आव्हान आहे. एकोणिसाव्या शतकापर्यंत आपली लोकसंख्या आणि उपलब्ध स्रोत यांचे प्रमाण संपन्नतेला बळ देणारं होतं. पण गेल्या शंभर वर्षांत आपली लोकसंख्या विस्फोट झाल्यासारखी विलक्षण वेगाने वाढली आहे. लोकसंख्यावाढीच्या बरोबरीने मिळकतही तितकीच वाढायला हवी. ती क्षमता आता आपल्या नैसर्गिक स्रोतांमध्ये उरलेली नाही. अशा परिस्थितीत धोरणांइतकीच अंमलबजावणीही निर्णायक महत्त्वाची ठरते. नव्या सरकारच्या बाबतीत अंमलबजावणीचे काय, हा प्रश्न नि:संदिग्धपणे निकालात काढण्याची स्थिती नाही. अंमलबजावणी नीट झाली नाही तर बाह्य रूप तितकेच आकर्षक राहते, पण आत्मा हरवतो. सरकारच्या बाबत तसे घडते आहे का, हे नि:संशयपणे सांगण्यास आणखी काही काळ वाट पाहावे लागेल.अर्थात, एक बाब नक्की आहे ती अशी, शिक्षणाच्या बाबतीतल्या नियमनात हे सरकार विशेषत: मनुष्यबळ विकास मंत्रालय अडखळत आहे. नियमनामागे एक निश्चित तत्त्वज्ञान लागते. नियमांना अशा तत्त्वज्ञानाची जोड मिळते तेव्हाच शिक्षणासारख्या प्रांतात प्रभावी नियमन होऊ शकते. जनतेच्या आकांक्षा उदंड आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून त्या पुऱ्या व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. पण नियमन नीट झाले नाही तर शिक्षणाची स्थिती लाभांशाकडून दिवाळखोरीकडे जाण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच शिक्षणाच्या क्षेत्रातील नियमनाकडे गंभीरपणे पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. पण गेल्या वर्षभरातला अनुभव त्याची ग्वाही देत नाही. आमच्यासारख्यांना आयआयटीच्या संचालकांची नेमणूक ही खूप गांभीर्याने घेण्याची, महत्त्वाची बाब वाटते. दुर्दैवाने सगळ्यांना तसे नाही वाटत. त्यातूनच मग काही प्रश्न निर्माण होतात. त्याच्या तपशिलात शिरण्याचा हा प्रसंग नव्हे.