शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कार प्रकरणी आणखी एकास अटक

By admin | Updated: August 30, 2015 01:37 IST

चिकलठाणा येथे प्रियकराबरोबर गप्पा मारत असलेल्या २२ वर्षीय तरु णीवर चार नराधमांनी केलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी शुक्रवारी रात्री एका नराधमाला अटक केल्यानंतर

औरंगाबाद : चिकलठाणा येथे प्रियकराबरोबर गप्पा मारत असलेल्या २२ वर्षीय तरु णीवर चार नराधमांनी केलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी शुक्रवारी रात्री एका नराधमाला अटक केल्यानंतर शनिवारी पोलिसांनी आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या, अन्य दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.गुरुवारी रात्री अत्याचाराची घटना घडली. मुंबईतील शक्ती मिलमधील घटनेची पुनरावृत्ती झालेल्या या खळबळजनक प्रकाराची गंभीर दखल घेत ग्रामीण पोलिसांनी तय्यब अली आणि शेख अश्फाक (रा. सुंदरवाडी) यांच्या मुसक्या आवळल्या. पीडित तरुणी व तिचा प्रियकर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरी करतात. दोघांचे परस्परांवर प्रेम असून ते लवकरच लग्न करणार आहेत. गुरुवारी रात्री ते सुंदरवाडी शिवारातील रस्त्यावर फिरण्यासाठी गेले. तेथे मोटारसायकल उभी करून ते गप्पा मारत होते. त्याचवेळी एकाच मोटारसायकलवरून आलेले २० ते २५ वयोगटातील चार नराधम त्यांच्याजवळ येऊन थांबले. युगुल तेथून जाऊ लागताच आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यास चाकूचा धाक दाखवून पकडून ठेवले, तर अन्य दोघांनी बळजबरीने तरुणीला शेतात ओढत नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. घटनेनंतर पीडित तरुणी व तिच्या मित्राने पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवीत नराधम तय्यबला शुक्रवारी रात्रीच बेड्या ठोकल्या. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानंतर शनिवारी रात्री मोठ्या शिताफीने पोलिसांनी अश्फाकला अटक केली, असे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे पीडित तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांनी तिचे समुपदेशन केले. माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांना अटक करा आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणी नोकरीला असलेल्या कंपनीतील व्यवस्थापकाला बोलावून त्यांनाही घटनेची माहिती घातली. तरुणी पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर तिला दुसऱ्या विभागात काम द्यावे; अथवा दुसऱ्या शाखेत तिची बदली करण्याची सूचना पोलीस अधीक्षकांनी त्यांना केली. (प्रतिनिधी)