शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दीड लाख लोकांचे जगणे झाले 'जीवनदायी'

By admin | Updated: November 18, 2014 23:24 IST

राजीव गांधी आरोग्य योजना : कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर, वर्षभरात १२ हजार १३८ रुग्णांची सेवा

गणेश शिंदे -- कोल्हापूर -उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’मुळे राज्यातील तब्बल दीड लाख रुग्णांचे प्राण वाचले आहेत. शासनाने त्यांच्यावर सुमारे चारशे कोटी रुपये खर्च केले आहेत. योजनेबाबत काही त्रुटी जरुर असल्या तरी त्याचा फायदा गोरगरिबांना होत आहे. या योजनेला गुरुवारी (दि. २० नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या योजनेचा लेखाजोखा ‘लोकमत’ने तपासला.या योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. वर्षात राज्यात १२ हजार १३८ रुग्णांवर तब्बल ३४ कोटी ७० लाख ३४ हजार रुपये खर्च झाले. सर्वाधिक मुंबईमध्ये १९ हजार ५१६ रुग्णांवर ६४ कोटी ६३ लाख ९५ हजार; तर कमीमध्ये नंदूरबार जिल्ह्याचा नंबर लागतो. नंदूरबारमध्ये वर्षभरात केवळ ६५ रुग्णांवर सात लाख ९५४ रुपये खर्च झाले आहेत. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने राज्यात सर्वप्रथम रायगड, सोलापूर, नांदेड, गडचिरोली, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यात ही योजना सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २७ जिल्ह्यांत २० नोव्हेंबर २०१३ पासून ती सुरू झाली. राज्यात वर्षभरात एकूण एक लाख ५२ हजार २५५ रुग्णांवरील उपचारांसाठी ३९७ कोटी ९७ लाख रुपये खर्च झाले. ही सेवा देणाऱ्या रुग्णालयांना एक लाख ५९ रुग्णांचा परतावा म्हणून नॅशनल इन्श्युरन्स कंपनीकडून २४७ कोटी २७ लाख रुपये मिळाले. या योजनेमधून कुटुंबातील एकाला दीड लाख रुपये खर्च मिळतो. किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. कोल्हापूर शहरातील २३ रुग्णालये, गडहिंग्लज, महागाव, जयसिंगपूर, इचलकरंजी व वडगाव प्रत्येकी एक अशा २८ रुग्णालयांत ही सेवा सुरू झाली. करवीर आघाडीवर, तर गगनबावडा पिछाडीवर...करवीर तालुका विधानसभा निवडणुकीच्या मतदानाबरोबर या योजनेमध्ये करवीर तालुका आघाडीवर असल्याचे खर्चाच्या आकडेवारीवरून दिसून येते. करवीरमध्ये ३८५१ रुग्णांवर दहा कोटी ३७ लाख २९ हजार ६७५ रुपये, तर गगनबावडा तालुक्यात सर्र्वाधिक कमी म्हणजे केवळ ३४ लाख २५ हजार ८०० रुपये ९३ रुग्णांवरील उपचारांसाठी खर्च झाले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात याचा फायदा होत असल्याने रुग्णालयांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.कॅन्सर, डायलेसिस रुग्णांवर सर्वाधिक उपचारया योजनेत ९७१ विविध आजारांवर उपचार करता येतात. कार्डियाक (हृदयरोग, हृदयविकार) ,किडनी (मूत्रपिंड), स्त्रियांचे आजार, फुप्फुस, आदी आजारांचा यांत समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कॅन्सर (कर्करोग) व डायलेसिसचे सुमारे १२००, तर जननमूत्र (किडनी स्टोन) ८००, कार्डियाक ७०० अशा रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्याचबरोबर बर्न (भाजून जखमी) सुमारे २५ , मेंदू / हाडाचे विकार ६०, डोळ्यांच्या विकारांचे शंभर, तर लहान मुलांच्या शस्त्रक्रियेवरील उपचार दीडशेजणांनी घेतले आहेत.राज्यात पहिल्या पाचमध्ये जिल्ह्याचा क्रमांक आला, ही बाब गौरवास्पद आहे. याचे कारण म्हणजे, या योजनेबाबत झालेली जनजागृती होय.- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर.शेवटचे पाच जिल्हेसिंधुदुर्ग, चंद्रपूर, परभणी, गडचिरोली व नंदूरबार या पाच जिल्ह्यांचा खर्च एक कोटीच्या आत आहे. ६५ रुग्णांपासून ते शेवट ५०० च्या आत रुग्णांचा समावेश आहे. परभणीमध्ये ४९६ रुग्णांवर ५२ लाख ४३ हजार रुपये वर्षभरात खर्च झाले आहेत. दरम्यान, राज्यात महानगरे व शहरे म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा नागपूर व पुणे जिल्ह्यांचा अनुक्रमे सहा व सात असा क्रमांक लागला आहे. नागपूरमध्ये ११ हजार ५०३ रुग्णांवर २७ कोटी ८६ लाख ९० हजार ९५० रुपये, तर पुण्यामध्ये नऊ हजार १७५ रुग्णांवर २५ कोटी ९८ लाख ३३ हजार ५७१ रुपये खर्च झाले आहेत. या आकडेवारीवरून या दोन जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न जास्त असल्याचे दिसते.कोल्हापूर जिल्हा तालुकानिहाय आकडेवारी...तालुक्याचे नाव रुग्णसंख्याखर्च (रुपयांत)करवीर३८५११० कोटी ३७ लाख २९ हजार ६७५हातकणंगले२३६०सात कोटी २८ लाख ६८हजार ४६८ शिरोळ११३८ दोन कोटी ८३ लाख ९५ हजार ६२० कागल८११दोन कोटी ३६ लाख९९ हजार ९०० राधानगरी६५८एक कोटी ९३ लाख ९९ हजार २०० शाहूवाडी५२३एक कोटी ६२ लाख ४५ हजार २०० गडहिंग्लज७८९एक कोटी ६१ लाख सात हजार ७५ भुदरगड ४५८एक कोटी ३१ लाख ८९ हजार ५२५ आजरा४६० एक कोटी १२ लाख २४ हजार ८०० चंदगड ३४८ एक कोटी तीन लाख २९ हजार ३००गगनबावडा ९३३४ लाख २५ हजार ८०० राज्यातील ‘टॉप फाइव्ह’ जिल्हेजिल्हारुग्णांची संख्याखर्च (रुपयांत)मुंबई १९ हजार ५१६६४ कोटी ६३ लाख९५ हजार ९८४अहमदनगर१४ हजार ९३२ ५२ कोटी ६८ लाख ४८ हजार ९९७औरंगाबाद १५ हजार १८६ ४० कोटी ८७ लाख ३८ हजार ४७३कोल्हापूर १२ हजार १३८ ३४ कोटी ७० लाख ३४ हजार ११३नाशिक१२ हजार ५४३२८ कोटी ३४ लाख १६ हजार ४९