शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भंवरलालजी जैन यांच्या निधनाने एक कर्मयोगी हरपला - राजेंद्र दर्डा

By admin | Updated: February 25, 2016 19:22 IST

ज्येष्ठ उद्योगपती भंवरलालजी जैन यांच्या निधनाने एक कर्मयोगी हरपला आहे. श्रमसंस्कृती आणि कृषीसंस्कृती ही जीवननिष्ठा मानून आयुष्यभर समर्पित भावनेने ते कार्यरत राहिले.

⁠⁠- राजेंद्र दर्डा, एडीटर- इन- चिफ,  लोकमत वृत्तपत्र समूह
 
ज्येष्ठ उद्योगपती भंवरलालजी जैन यांच्या निधनाने एक कर्मयोगी हरपला आहे. श्रमसंस्कृती आणि कृषीसंस्कृती ही जीवननिष्ठा मानून आयुष्यभर समर्पित भावनेने ते कार्यरत राहिले.  आयुष्यातील खडतर परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनात उच्च पदावर चालून आलेली नोकरी नाकारून या भूमीपुत्राने शेतीपूरक उद्योगाची मूहूर्तमेढ रोवली आणि इतिहास निर्माण केला.  आपल्यासोबतच अवती-भोवतीच्या लोकांचेही जीवनमान बदलून त्यांचीही उन्नती व्हावी, माणसापासून ते प्राणीमात्रांचीही सेवा घडावी हिच त्यांची प्रेरणा होती. जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांचे आयुष्य घडविले. शेती संशोधनात त्यांनी सातत्याने नव-नवीन प्रयोग केले. पाण्याचे महत्व ओळखून कालदर्शी असणाºया भंवरलालजींनी ठिबक सिंचनाचा कृतिशील पुरस्कार करीत कृषिक्षेत्रात क्रांती केली. व्यापार, उद्योग, व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीची जोपासना  केली. अनेक सेवाभावी संस्थांचे ते आधारवड होते.  जळगावचे नाव जगाच्या नकाशावर नेताना आपल्या मातीशी नाते त्यांनी कधीही तोडले नाही. माझे वडील जवाहरलालजी दर्डा आणि त्यांचे  जिव्हाळ्याचे नाते होते. दर्डा परिवार आणि लोकमत परिवाराशी त्यांचे ऋणानुबंध होते. भंवरलालजींच्या निधनाने खान्देश आणि महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.