शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाचे चोरीचे मोबाईल हस्तगत

By admin | Updated: October 12, 2015 00:31 IST

कऱ्हाडात कारवाई : एकास अटक; तीसहून अधिक मोबाइल जप्त

कऱ्हाड : गर्दीच्या ठिकाणावरून महागडे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून दीड लाखाहून अधिक किमतीचे चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. श्रावण राजेश कांबळे (वय २३, रा. शिक्षक कॉलनी, मलकापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या मोबाइल चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडातील एका महिलेचा महागडा मोबाइल काही दिवसांपूर्वी चोरीस गेला होता. याबाबतची तक्रार संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक एच. एन. काकंडकी यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. चोरीस गेलेल्या मोबाइलचे सातारच्या संगणक शाखेच्या माध्यमातून तांत्रिक निरीक्षक केल्यानंतर संबंधित मोबाईल मलकापुरातील एका युवकाकडे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता संबंधित मोबाइल श्रावण कांबळे याच्याकडून आपण विकत घेतल्याचे त्या युवकाने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी श्रावणला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केली असता त्याने संबंधित मोबाइल चोरल्याचे कबूल केले. तसेच त्याने अन्य गुन्ह्णांची कबुलीही पोलिसांसमोर दिली. मलकापुरातील शिक्षक कॉलनीत वास्तव्यास असणारा श्रावण कांबळे हा कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास होता. त्यावेळी साथीदारांच्या मदतीने त्याने पुण्यात काही मोबाइल चोरले होते. (प्रतिनिधी)महागड्या मोबाइलवर लक्षगर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर श्रावण नागरिकांच्या हातातील मोबाइलवर पाळत ठेवायचा. एखाद्याच्या हातात महागडा मोबाइल दिसला, तर तो त्याचा पाठलाग करायचा. संधी मिळताच संबंधित मोबाइल चोरून तो पसार व्हायचा. संबंधित मोबाईल तो हजार ते दोन हजारांत युवकांना विकायचा, अशी माहिती पोलीस तपासात उघड होत आहे.