शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिलेचे अपहरण करणारा अटकेत, महिलेचा शोध सुरू

By admin | Updated: February 5, 2017 15:47 IST

नातेवाईकाचे लग्न आटोपून समतानगर येथे जाण्यास निघालेल्या वृद्ध महिलेचे अपहरण करणा-या एका संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 5 -  नातेवाईकाचे लग्न आटोपून समतानगर येथे जाण्यास निघालेल्या वृद्ध महिलेचे अपहरण करणा-या एका संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. २७ जानेवारी रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीजवळ हे अपहरण झाले. महिलेजवळ रोख २४ हजार रुपये आणि दिड तोळ्याचे दागिने होते. हा ऐवज लुटण्यासाठी हे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
नजीर सांडू पटेल(४०,रा. निर्मलनगर, मुकुंदवाडी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सरस्वती रुंजाजी गवळी(६५,रा.समतानगर) असे अपहरण झालेल्या वृद्धेचे नाव आहे.  पोलिसांनी सागिंतले की, समतानगर येथील निवासी राहुल रुंजाजी गवळी यांच्या नातेवाईकाचे पुंडलिकनगर परिसरातील न्यू हनुमाननगर येथे विवाह होता. या विवाहसाठी राहुल, त्यांची आई-वडिल,भाऊ आणि अन्य नातेवाईक उपस्थित होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांचे वडिल, भाऊ हे घरी गेले. राहुल आणि त्याची आई मागे थांबले होते. काही वेळानंतर तते सोबत घरी जाणार होते. रात्री साडेनऊ ते पावणे दहा वाजेच्या सुमारास सरस्वती यांनी मी  पुढे पायी जाते असे राहुलला सांगून त्या निघाल्या. पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीजवळून त्या जात असताना अचानक गायब झाल्या.
त्यानंतर दहा मिनिटाने पाहुण्याच्या घरीहून निघालेला राहूल रोडवर आला.  तेथे त्यास आई दिसली नाही.यामुळे आई घरी गेली असेल असे समजून तो थेट घरी गेला तेव्हा आई घरी आली नसल्याचे त्यांना नातेवाईकांना सांगितले. यामुळे तो पुन्हा परत आला आणि पुंडलिकनगर, हनुमानगर येथील नातेवाईकांकडेही शोध घेतला परंतु सरस्वती भेटल्या ननाही.शेवटी दुसºया दिवशी त्यांनी पुंडलिकनगर पोलीस चौकीत सरस्वती हरवल्याची तक्रार नोंदविली. आईचा शोध घेत असताना निर्मलनगर भागातील एका जणासोबत तुमची आई पाहिल्याची माहिती त्यांना दिली. त्यामुळे राहुल यांनी पोलिसांना सोबत घेऊन त्या आरोपीच्या घरी सरस्वती यांचा शोध घेतला असता तेथे त्यांना त्यांच्या चपला आढळल्या. आरोपी हा घरी नव्हता. त्याच्या पत्नीने महिला घरी आली होती आणि तिच्यापतीने त्यांना सोबत नेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दोन दिवसानंतर नजीर हा पोलिसांच्या हाती लागला. त्यावेळी त्याने सरस्वती यांना त्याने रेल्वेने मनमाड रेल्वेस्थानकावर नेऊन सोडल्याची कबुली दिली. 
त्याच्या सांगण्यानुसार पोलीस नजीर यास सोबत घेऊन मनमाड येथेही जाऊन आले. परंतु तेथेही सरस्वती आढळल्या नाही. शेवटी राहुलने दिलेल्या तक्रारीवरुन नजीरला पोलिसांनी अटक केली.