शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या उड्डाणपुलाच्या पिलर्सना तडे

By admin | Updated: November 4, 2016 03:01 IST

वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या रेल्वे उड्डाणपूलाच्या पिलर्सना तडे गेले आहेत.

शशी करपे,

वसई- वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या रेल्वे उड्डाणपूलाच्या पिलर्सना तडे गेले आहेत. माणिकपूर पोलिसांनी पाहणी केल्यानंतर पूलाची तातडीने दुरूस्ती करावी, असे पत्र सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे आणि महापालिकेला दिले आहेत. रेल्वेने मात्र पूल सुरक्षित असून भक्कम असल्याचा दावा केला आहे.वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेल्वे वरील उड्डाणपूल रेल्वेने १९७६ साली बांधला आहे. एकच पूल असल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी होत असल्याने या पूलाशेजारीच एमएमआरडीएने नवा पूल बांधला आहे. या पूलाचे काम तब्बल सात वर्षे रखडून पडले होते. शेवटी आॅगस्ट महिन्यात नव्या पूलावरून वाहतूक सुरु करण्यात आली. सध्या जुन्या आणि नव्या पूलावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जुन्या पूलाच्या पिलर्सने तडे गेलच्या तक्रारी वाहन चालकांकडून केल्या जात आहेत. माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी पिलर्सची पाहणी केली. यावेळी तडे गेल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्यानंतर पाटील यांनी वसई विरार महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते आणि रेल्वेला पिलर्सला तडे गेल्याचे दिसून येत असल्याने त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे कळविले आहे. जुन्या उड्डाणपूलावरून एकेरी वाहतूक सुरू असून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरु आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी या पूलाला तडे गेलच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यावेळी तत्कालीन आमदार विवेक पंडित यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी नेऊन डागडुजी करुन घेतली होती. त्यानंतर पुन्हा तडे गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये घबराट आहे.पूलाला तडे गेल्याचे दिसत असले तरी रेल्वे प्रशासनाने मात्र तडे पिलर्सना नसून प्लास्टरला गेले आहेत. पिलर्सचा गाभा मजबूत आणि सुरक्षित असल्याचा रेल्वेचा दावा आहे. >तडे गेल्याचे दिसत असून याप्रकरणी रेल्वे, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवले आहे. तडे प्रकरणात आम्ही जातीने लक्ष ठेऊ आहोत. -अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक> रेल्वे पूलाचे वार्षिक सर्वेक्षण केले जात असून दुरुस्तीही निमितपणे केली जाते. पूलाला तडे गेलेले नाहीत. पूल सुरक्षित आणि भक्कम आहे. घाबरण्याचे काही कारण नाही.-एस. मीना, अभियंता, रेल्वे