शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

देहरे, सावरपाड्याचा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: April 28, 2016 03:53 IST

जव्हार तालुक्यातील देहरे, सावरपाडा, दसकोड, या ग्रामपंचायत हद्दीतील वेळेत वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे.

हुसेन मेमन,

जव्हार-जव्हार तालुक्यातील देहरे, सावरपाडा, दसकोड, या ग्रामपंचायत हद्दीतील वेळेत वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे २६ एप्रिल रोजी महिलांनी जव्हार पंचायत समितीला घेराव घेतला.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आदिवासी उपयोजना पाणी पुरवठा अंतर्गत२१ वर्षांपूर्वी पाण्यासाठी, सावरपाडा येथे टाकी बांधण्यात आली आहे. येथून या ग्रामपंचायतीतील गाव पाड्यांना पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र या योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या वीजेचे बिल न भरल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदिवासी उपयोजने अंतर्गत कोरतड, मेढा, मोचार्पाडा, डुंगणी, भांगडा, दसकोड, सावरपड़ा, पादवीपाडा, कॉलनीपाडा, देहरे, कडव्याचीमाळी, खडकी पाडा, देवगाव, जळ विहिरा, देवगाव, बोरीचापाडा, या गाव-पाड्याना जीवन प्राधिकरण आदिवासी उपयोजने अंतर्गत पिण्याचा पुरवठा केला जातो. देहरे ग्राम पाणी पुरवठा समितीने वसूली करून, लाईट बिल भरणे, देखभाल खर्च, नोकरांचा पगार, किरकोळ दुरुस्ती, हा खर्च याबाबतची माहिती ग्रामस्थांना न दाखवता केल्याचा आरोप केला गेला आहे.देहरे, सावरपाडा, कोरतड, या ग्रामस्थांना गेल्या महिना भरापासून वीजपुरवठा खंडीत असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील महिलांना ३ ते ४ कि.मी, अंतरावर पाण्यासाठी वणवण करतात. तर विहीरींना पाणी असूनही वीजपुरवठा नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी योजनेची विहीरही २२ कि.मी अंतरावर आहे.