शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये बार असोसिएशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांत हाणामारी!

By admin | Updated: November 22, 2014 03:06 IST

नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्या (डीबीए) शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्येच जोरदार हाणामारी झाली़

नागपूर : नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्या (डीबीए) शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्येच जोरदार हाणामारी झाली़ यात सरचिटणीस मनोज साबळे जखमी झाले. ही घटना दुपारी ३च्या सुमारास घडली. दरम्यान, साबळे यांनी सदर पोलीस ठाण्यात डीबीएचे अध्यक्ष सुदीप जयस्वाल आणि सहसचिव मनीष रणदिवे यांच्याविरुद्ध नोंदवलेली तक्रार आपसात समझोता झाल्याचे सांगून सायंकाळी मागे घेतली. १७ आॅक्टोबर रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष सुदीप जयस्वाल यांनी २१ नोव्हेंबर २०१३नंतरच्या नवीन सदस्यांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार न देण्याबाबतचा प्रस्ताव आणला होता. याला तिघांनी विरोध केला होता; तर १० सदस्यांनी समर्थन दिले होते. त्यामुळे हा प्रस्ताव पारित झाला होता. निवडणूक समितीने मात्र हा प्रस्ताव नामंजूर करून सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव पारित करावा, त्याला आपण मंजुरी देऊ, असे म्हटले होते. नवीन सदस्यांचा हा प्रस्ताव पारित करण्याच्या संदर्भात शुक्रवारी दुपारी २ वाजता ही सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. सरचिटणीस मनोज साबळे यांनी नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा आणि १९ डिसेंबर २०१४ रोजी मतदान घ्यायचे, असे म्हटले. त्यावरून सुदीप जयस्वाल संतप्त झाले. तेव्हा पुन्हा साबळे यांनी तुमची दादागिरी चालणार नाही, असे म्हटले. नेमक्या याच प्रकाराने सभेला हिंसक वळण लागले. माईक हिसकावण्याचा प्रकार होऊन जयस्वाल हे साबळे यांना मारहाण करण्यास पुढे आले. त्याच वेळी रणदिवे हे मध्ये पडले. साबळे यांची बुक्की रणदिवे यांना लागताच ते चिडले. त्यांनी हातातील कडे साबळे यांच्या कपाळावर मारल्याने त्यांना दुखापत झाली़ (प्रतिनिधी)