शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आराखडा रद्द झाल्यामुळे अधिकारी नाराज

By admin | Updated: April 22, 2015 04:23 IST

असंख्य घोळांमुळे वादग्रस्त ठरलेले विकास नियोजन आराखड्याचे प्रारूप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द ठरविल्यामुळे बिगर शासकीय संस्था

मुंबई : असंख्य घोळांमुळे वादग्रस्त ठरलेले विकास नियोजन आराखड्याचे प्रारूप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द ठरविल्यामुळे बिगर शासकीय संस्था, लाखो झोपडपट्टीवासी, कोळीवाडे, गावठाण, फेरीवाले यांना दिलासा मिळाला आहे़ परंतु चार वर्षांची मेहनत, करोडो रुपये, मनुष्यबळ, वेळ वाया गेल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे़ नवीन आराखड्याला चार महिन्यांत आकार द्यायचा कसा, याबाबतही अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे़शहराच्या विकासाची दिशा ठरविणारा सन २०१४ ते २०३४ या पुढील २० वर्षांचा आराखडा अंतिम टप्प्यात पोहोचला होता़ मात्र यामधील असंख्य त्रुटी व घोळ दररोज नव्याने पुढे येऊ लागल्यावर सामाजिक व राजकीय दबाव वाढून अखेर मुख्यमंत्र्यांनी हा आराखडाच आज रद्द केला़ मात्र ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र प्रादेशिक विकास नियोजन कायद्याचा (एमआरटीपी) भंग असल्याचा सूर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लावला़ एमआरटीपी कायद्यानुसार आराखड्याच्या प्रारूपावर हरकती व सूचना मागविण्यात येत होत्या़ त्यानुसार आराखड्यात सुधारणा करून नियोजनाला अंतिम रूप मिळाले असते़ मात्र ही प्रक्रिया सुरू असतानाच संपूर्ण आराखडा रद्द ठरविणे खेदजनक आहे, अशी नाराजी या प्रक्रियेतील अधिकाऱ्याने व्यक्त केली़ राज्याच्या अर्थसंकल्पातही छोट्या-मोठ्या चुका होत असतात़ या चुका सुधारता येण्यासारख्या होत्या, असे मत अधिकारी व्यक्त करीत आहेत़ (प्रतिनिधी)