शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अधिकृत दलालही काळाबाजारात

By admin | Updated: April 4, 2015 05:06 IST

मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून आॅनलाइन पद्धतीने विक्री होते. मात्र ही विक्री होतानाच आयआरसीटीसीच्या ‘अधिकृत

सुशांत मोरे, मुंबईमेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून आॅनलाइन पद्धतीने विक्री होते. मात्र ही विक्री होतानाच आयआरसीटीसीच्या ‘अधिकृत’ दलालांकडूनच ‘अनधिकृत’पणेही तिकीटविक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून हा प्रकार अद्याप समोर आणला गेला नाही. पश्चिम रेल्वेमार्गावर गेल्या सव्वादोन वर्षांत आयआरसीटीसीच्या अधिकृत दलालांवर कारवाई करण्यात आली असून, २२ प्रकरणांमध्ये २९ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे आॅनलाइन तिकीट मिळविण्यासाठी आयआरसीटीसीमार्फत आरक्षण केले जाते. अशा प्रकारे आरक्षण होत असतानाच दलालांनी अनेक वेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनधिकृतपणे तिकीट देण्याचा धंदा सुरू केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अनधिकृत दलालांकडून अशा प्रकारे ई-तिकिटांमध्ये गैरप्रकार सुरू केले असतानाच यामध्ये आयआरसीटीसीचे अधिकृत दलालही आघाडीवर असल्याचे पश्चिम रेल्वे आरपीएफच्या (केंद्राचे रेल्वे पोलीस दल) निदर्शनास आले आहे. २0१३ ते २0१५ (मार्चपर्यंत)पर्यंत अनधिकृत दलालांविरोधात केलेल्या कारवाईत २३९ केसेस करण्यात आल्या असून, यामध्ये २६७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृत दलालांविरोधात कारवाई होत असतानाच आयआरसीटीसीचे अधिकृत दलालही ई-तिकिटांमध्ये गैरप्रकार करीत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्याविरोधात केलेल्या कारवाईत २२ केसेसमध्ये २९ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले. याबाबाबत पश्चिम रेल्वे आरपीएफचे (मुंबई विभाग) वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी सांगितले की, ई-तिकिटांचा मोठा घोटाळा, गैरप्रकार उघडकीस येत आहे. यामध्ये अनधिकृत दलालांकडून गैरप्रकार होत असतानाच अधिकृत दलालही गैरप्रकार करीत असल्याची माहिती आम्हाला मिळत गेली आणि त्याची खात्री करून कारवाईस सुरुवात केली. याबाबत आयआरसीटीसीला वेळोवेळी माहिती देण्यात आली असून, त्याला पायबंद घालण्यात यावा, अशी सूचनाही केली आहे. ज्या अधिकृत दलालांकडून गैरप्रकार केले जात आहेत; आणि त्यांच्यावर संशय येत आहे अशांची यादीच देण्याचीही मागणीही करण्यात आली आहे.