शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गावाला हक्काचा इंजिनिअर

By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST

पंचायत सक्षमीकरण अभियान : जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींचा समावेश

रहिम दलाल - रत्नागिरी स्थानिक विकासाचे केंद्र म्हणून ५०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ मोठ्या ग्रामपंचायती विकसित करण्यासाठी व त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामाचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास फार उशीर होतो. त्यासाठी शासनाने ग्रामपंचायत स्तरावरच विकासकामाचे मूल्यांक होऊन अंदाजपत्रके झाल्यास कामे अधिक सुलभ व लवकर होतील, या हेतूने शासनाने हे पाऊल उचलले आहे.राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करणार आहेत. त्याचबरोबर त्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून काम पूर्ण होईपर्यंत देखरेख करणे तसेच कामाच्या मुल्यांकनासह पूर्णत्त्वाचा दाखलाही हे अभियंतेच देणार आहेत. सुमारे ५००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियंते नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ५०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या २१ ग्रामपंचायती आहेत. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात येणाऱ्या अभियंत्यांमुळे विकासकामे लवकर मार्गी लागणार आहेत. त्यामुळे वाडी, वस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.गावच्या विकासासाठी...अभियंत्यांवरील जबाबदाऱ्याग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामासाठी व इतर प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे, कामांची अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया करणे, वेळप्रसंगी कामांवर देखरेख करणे, मोजमाप व मुल्यांकन करणे आदी जबाबदाऱ्या या अभियंत्यांना पार पाडाव्या लागणार आहेत.गावचा विकास गावच्या हातीग्रामपंचायतींत अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये त्या गावची प्रत्यक्ष पाहणी करुन या अंभियत्याला विकास आराखडा तयार करण्यास सोयीचे जाणार आहे. त्यामुळे योग्य प्रकारे गावचा विकास साधला जाणार आहे.मंडणगड, लांजातील ग्रा. पं. नाहीमंडणगड आणि लांजा या दोन तालुक्यांमध्ये ५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली एकही ग्रामपंचायत नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यामध्ये अभियंता नियुक्तीच्या निकषात एकही ग्रामपंचायत बसत नसल्याने तालुक्यात एकाही ग्रामपंचायतीमध्ये अभियंत्याची नियुक्ती करण्यात येणार नाही. विकासाचा मार्ग खुलाग्रामीण भागामध्ये विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यात येत होते. त्यामुळे विकासकामे करताना अनेक अडचणींसह बराच कालावधी वाट पाहावी लागत होती. त्यामुळे केंद्रातील तत्कालीन आघाडी शासनाने अभियंते नियुक्त्यांच्या माध्यमातून विकासाचा मार्ग खुला केला आहे.तालुकाग्रामपंचायत दापोलीबुरोंडी, गिम्हवणे, दाभोळ, हर्णै, जालगाव.खेड भरणे.चिपळूणपोफळी बुद्रुक, सावर्डे, गुहागरपाटपन्हाळे, पालशेत. खेर्डी.संगमेश्वरकडवई, नावडी. रत्नागिरीपावस, करबुडे, नाचणे, कुवारबाव, गोळप, मिरजोळे, शिरगाव.राजापूर सागवे.२१ ग्रामपंचायतींमध्ये होणार अभियंत्यांच्या नियुक्त्याथेट ग्रामपंचायतीमधून होणार विकास कामे५००० पेक्षा जास्त लोकसंख्येचा निकषग्रामपंचायती होणार तांत्रिकदृष्ट्या सक्षमगावच्या विकासाला गती मिळणार.