शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील संदेश तरुणास भोवला

By admin | Updated: July 4, 2015 03:24 IST

आॅर्कुटवर झालेल्या मैत्रीनंतर तरुणीला ईमेलवर अश्लील संभाषण, फोटो पाठविणाऱ्या मॅकेनिकल इंजिनीअर तरुणाला बुधवारी न्यायालयाने ३ महिन्यांचा कारावास व दंड ठोठावला.

मुंबई : आॅर्कुटवर झालेल्या मैत्रीनंतर तरुणीला ईमेलवर अश्लील संभाषण, फोटो पाठविणाऱ्या मॅकेनिकल इंजिनीअर तरुणाला बुधवारी न्यायालयाने ३ महिन्यांचा कारावास व दंड ठोठावला. अशा प्रकारे महिलांना मनस्ताप दिल्याबद्दल (सायबर स्टॉकिंग) आरोपीला शिक्षा झालेले राज्यातले हे पहिलेच प्रकरण आहे.योगेश प्रभू असे आरोपीचे नाव असून, तो नवी मुंबईचा रहिवासी आहे. २००९मध्ये ३३ वर्षांच्या तरुणीशी त्याची आॅर्कुटच्या माध्यमातून ओळख झाली. सुरुवातीच्या संवादानंतर दोघांच्या गाठीभेटी झाल्या. जसजशी ओळख वाढत गेली तसतसा योगेशचा स्वभाव तिला खटकू लागला. त्यामुळे तिने योगेशला आॅर्कुट अकाउंटमधून काढून टाकले. या घटनेच्या काही दिवसांनंतर तरुणीच्या आयडीवर अनोळखी आयडीवरून अश्लील मजकुराचे ईमेल येऊ लागले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. मात्र या अश्लील ईमेलचे प्रमाण वाढू लागल्याने तिने गुन्हे शाखेचे तत्कालीन सहआयुक्त राकेश मारिया यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. मारिया यांनी तत्काळ या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश सायबर सेलला दिले.त्यानुसार शिवाजीपार्क पोलीस ठाण्यात भादंवि, माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. एसीपी नंदकिशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद पवार व पथकाने तपास सुरू केला. तपासात अश्लील मजकूर, फोटो धाडणाऱ्या आयडीचा आयपी अ‍ॅड्रेस पथकाने शोधला. हा आयपी अ‍ॅड्रेस असलेल्या कंपनीत पथकाने चौकशी केली तेव्हा योगेश प्रभूचे नाव समोर आले.पोलिसांनी केलेल्या चौकशीत योगेशने अश्लील ईमेल पाठवल्याची कबुली दिली. त्याने तयार केलेल्या बोगस ईमेल आयडीची तपासणी झाली तेव्हा सेंट बॉक्समध्ये ते सर्व ईमेल पोलिसांना आढळले. अटकेनंतर १० दिवस पोलीस कोठडीत पाठविण्यात आलेल्या प्रभूविरोधात सायबर पोलिसांनी सप्टेंबर २००९मध्ये आरोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सायबर सेल व सरकारी वकिलांनी प्रभूविरोधातील पुराव्यांची साखळी न्यायालयासमोर सादर केली. खटल्याची सुनावणी या वर्षी ३ जून रोजी पूर्ण झाली. शुक्रवारी न्यायालयाने निकालवाचन पूर्ण करून प्रभूला शिक्षा ठोठावली.सायबर क्षेत्रात स्त्रीयांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे एखाद्या महिलेला अश्लील मजकूर, छायाचित्र पाठविण्याच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा झाल्याने जनतेत, स्त्रियांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच असे गुन्हे करणाऱ्यांना नक्कीच वचक बसेल. - धनंजय कुलकर्णी, डीसीपी, मुंबई गुन्हे शाखा