शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

...तर ओबीसींना त्यांची खरी ताकद कळेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:43 IST

राज्यात जातनिहाय गणना केल्यास ओबीसींना खरी ताकद कळेल. तसे झाल्यास सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती जातील

मुंबई : राज्यात जातनिहाय गणना केल्यास ओबीसींना खरी ताकद कळेल. तसे झाल्यास सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती जातील, अशी भीती सरकारला असून, म्हणूनच ते जातनिहाय गणना करण्यास घाबरत आहे. मात्र, जातनिहाय गणना होत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले आहे. आझाद मैदानात शुक्रवारी पार पडलेल्या ओबीसी संविधानिक न्याय यात्रेच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.ओबीसी समाजाची जातगणना व्हावी, समाजात त्या दृष्टीने जनजागृती व्हावी, भटके विमुक्त अल्पसंख्यांकांना सुरक्षा, तसेच नागरी हक्क मिळावेत, सर्व मागासवर्गीय आयोगांची अंमलबजावणी व्हावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरात संविधान न्याय यात्रेची सुरुवात ११ एप्रिलपासून झाली. त्याचा समारोप समारंभ शुक्रवारी दादरमधील चैत्यभूमी येथे झाला. त्यानंतर, आझाद मैदान संविधानिक न्याय यात्रा महापरिषद पार पडली. त्या वेळी मुणगेकर म्हणाले की, १९३१ साली ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली होती. त्यानंतर, आजवर जातनिहाय गणना करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे ही जनगणना तत्काळ सुरू करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. देशात ओबीसींची संख्या ५२ टक्के, दलित २० टक्के, तर आदिवासी १० टक्के आहेत. म्हणजे एकूण ८२ टक्के असणारी जनता विविध राजकीय पक्षांना मतदान करतात आणि निवडून आलेले १० टक्के अभिजन त्यांच्यावर राज्य करतात. हे चित्र कुठेतरी बदलायला पाहिजे. त्यासाठी देशातील सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र होऊन लढा देण्याची गरज मुणगेकर यांनी व्यक्त केली.या वेळी उत्तर प्रदेशचे खासदार निषाद, आमदार हरिभाऊ राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार हरिभाऊ राठोड म्हणाले की, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती यांची जनगणना करतानाच क्रिमिलेअरची अट रद्द केली पाहिजे. सरकारच्या आरक्षण संपवा धोरणास आमचा विरोध आहे. ओबीसींची जनजागृती मोहिम हाती घेतली असून, त्याचा व्यापक परिणाम देशभरात दिसत असल्याचा दावाही राठोड यांनी केला.