शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पोषणनिधीचे कुपोषण

By admin | Updated: October 19, 2016 03:55 IST

पालघर जिल्ह्याला कुपोषणाचा लागलेला डाग पुसून काढण्यासाठी देण्यात आलेला पोषण आहार निधी अपुरा पडत असून

पालघर : पालघर जिल्ह्याला कुपोषणाचा लागलेला डाग पुसून काढण्यासाठी देण्यात आलेला पोषण आहार निधी अपुरा पडत असून अंगणवाडी सेविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे, त्याचे व त्यांना शासनाकडून मिळत असलेल्या सापत्न वागणूकीचे पडसात रविवारी चहाडे येथील अंगणवाडी सेविकांच्या निर्धार मेळाव्यात उमटले.अंगणवाडी सेविकेचा मागील चार महिन्यांचे मानधन मिळाले नसून एन दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे आहेत. अनेक जबाबदाऱ्या दिल्या जात असताना इमारत नाही, मदतनीस नाही अशा परिस्थितीत कामे तरी कशी करायची असा प्रश्न त्यांनी निर्धार मेळाव्यात व्यक्त केला आहे. स्तनदा माता, मुलांच्या आहाराचे अन्न शिजविण्यास सोयीसुविधा नसल्यामुळे जास्त वेळ खर्ची पडतो. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. तसेच कुपोषित बालकांना देण्यात येणारी औषधेही आरोग्य विभागाकडून वेळेवर देण्यात येत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुलांच्या शैक्षणिक साहित्यासह इतर साहित्य पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातून डोक्यावर वाहून स्टेशनपर्यंत नेणे थांबवावे, अपुऱ्या मानधनात वाढ करावी, निवृत्ती वेतन मिळावे, भाऊबीजेच्या रक्कमेत वाढ करावी, मदतनीसची संख्या वाढावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. (वार्ताहर) >एका मुला मागे ४ रुपये ९२ पैसेपोषण आहार शिजविण्यासाठी इमारतीची व्यवस्था नसल्याने पोषण आहार शिजवायचा तरी कसा? असा प्रश्न उपस्थित करून उकडलेल्या अंड्यासाठी पाच रुपये आणि भाकरी, भात, वरण, भाजी आदीसाठी अवघे २५ रुपयांचे अपुरे अनुदान दिले जात असल्याने बालकांना पुरेसा पोषण आहार पुरविण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. एका मुला मागे ४ रुपये ९२ पैसे करणावळीचा दर सन २००६ पासून महागाईमध्ये वाढ होऊनही कायम असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.