शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंग अभ्यासक्रमाची पदे वगळली

By admin | Updated: December 28, 2016 01:28 IST

परिचर्या महाविद्यालयात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ४१ शैक्षणिक पदांपैकी पाठ्यनिर्देशक हे पद वगळून उर्वरित सर्व व रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असल्याने ती लोकसेवा

मुंबई : परिचर्या महाविद्यालयात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ४१ शैक्षणिक पदांपैकी पाठ्यनिर्देशक हे पद वगळून उर्वरित सर्व व रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असल्याने ती लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून एक वर्षासाठी वगळून त्यांच्या भरतीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.नवी दिल्ली येथील भारतीय परिचर्या परिषदेच्या सूचनेनुसार राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत जनरल नर्सिंग व मिडवायफरी अभ्यासक्रमाच्या राज्यात कार्यरत असलेल्या १० शाळांपैकी दोन शाळांचे मिडवायफरीमधून परिचर्या महाविद्यालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका महाविद्यालयात ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे बी. एस्सी. (नर्सिंग) पदवी अभ्यासक्रम तसेच दुसऱ्या महाविद्यालयात ५० विद्यार्थी क्षमतेचे बी. एस्सी. (नर्सिंग) व २५ विद्यार्थी क्षमतेचे एम.एस्सी (नर्सिंग) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबातचा त्यात समावेश आहे. परंतु भारतीय परिचर्या परिषदेनुसार आवश्यक शैक्षणिक संवगार्तील पदे मंजूर नसल्याने २०१४ मध्ये ४१ शैक्षणिक व ३ अशैक्षणिक पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये प्राध्यापक आणि प्राचार्य (४), प्राध्यापक आणि उपप्राचार्य (५) सहयोगी प्राध्यापक (९), अधिव्याख्याता (१५), पाठ्यनेशक/ चिकित्सालयीन निर्देशक (८), वसतीगृह अधिक्षिका (३) या पदांचा समावेश आहे. प्राचार्य, प्राध्यापक नि उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता या मंजूर पदांसोबत मुंबईच्या परिचर्या शिक्षण संस्थेतील रिक्त पाच पदांसह एकूण ३८ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून भरण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)यापूर्वी पदविका अभ्यासक्रम शिकवित असलेल्या परंतु ज्यांच्याकडे एमस्सी (नर्सिंग) ही अर्हता असलेल्या ज्येष्ठतम पाठ्यनिर्देशकांनाच प्राचार्य, उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता या पदनामाने संबोधून त्यांच्याकडून अध्यापकाचे काम करून घेण्यात येत असे. मात्र, त्यांना अनुदेय वेतन मात्र दिले जात नाही. त्यामुळे या पदांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी अशी भारतीय परिचर्या परिषदेकडून सूचना होती.