शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

परिचारिका निवड यादी रद्द

By admin | Updated: November 28, 2014 01:48 IST

महानगरपालिकेने 28 मार्च 2क्11 रोजी जाहीर केलेली परिचारिका व परिचारिका प्रसाविकांची निवड यादी रद्द झाली आहे.

नागपूर : महानगरपालिकेने 28 मार्च 2क्11 रोजी जाहीर केलेली परिचारिका व परिचारिका प्रसाविकांची निवड यादी रद्द झाली आहे. निवड यादी रद्द करण्याच्या पत्रविरुद्ध 35 परिचारिका व परिचारिका प्रसाविकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व चंद्रकांत भडंग यांनी गुरुवारी याचिका फेटाळून लावली.
अतिरिक्त आरोग्य संचालकांनी केंद्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या 15 नागरी आरोग्य केंद्रांना पुनर्जीवित करण्यास मान्यता दिली होती. त्यासाठी परिचारिकांच्या 16 व परिचारिका प्रसाविकांच्या 6क् अशा एकूण 76 पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्या वेळी या नियुक्त्या करण्याचे अधिकार मनपाच्या जनरल बॉडीला होते. जनरल बॉडीद्वारे नियुक्त निवड समितीने उमेदवारांच्या मुलाखती घेऊन 28 मार्च 2क्11 रोजी अंतिम निवड यादी जाहीर केली. यानंतर कायद्यात दुरुस्ती झाली. त्यात जनरल बॉडीचे अधिकार मनपा आयुक्तांना देण्यात आले. यामुळे आयुक्तांनी शासनाला पत्र लिहून निवड यादी रद्द करण्याची सूचना केली. शासनाने कायदा दुरुस्ती निवड यादीनंतर झाल्याचे कारण देऊन ही सूचना फेटाळून लावली. यानंतर मनपाने 16 फेब्रुवारी 2क्13 रोजी संबंधित उमेदवारांना त्यांची निवड झाल्याचे पत्र पाठवले. त्यापुढे एक वर्षार्पयत काहीच कारवाई झाली नाही. यामुळे आयुक्तांनी 12 मार्च 2क्14 रोजी शासनाला पत्र पाठवून एक वर्षानंतर निवड यादी रद्द होत असल्याचे कळविले. परिणामी 35 परिचारिका व परिचारिका प्रसाविकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मनपा आयुक्तांचे पत्र रद्द करून निवड यादीनुसार नियुक्त्या करण्याची त्यांची विनंती होती.  (प्रतिक्रिया)