शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

आता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म

By admin | Updated: January 18, 2017 06:58 IST

राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याची सिद्धता करणारे 'नमुना-२ (ब)' हे पत्र आता उमेदवारी अर्जासोबतच दाखल करावे लागणार आहे.

गजानन मोहोड,

अमरावती- राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याची सिद्धता करणारे 'नमुना-२ (ब)' हे पत्र आता उमेदवारी अर्जासोबतच दाखल करावे लागणार आहे. पूर्वी छाननीच्या दिवसापर्यंत हे नमुनापत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना होती. तथापि, नियमात करण्यात आलेल्या ताज्या बदलानंतर उमेदवारांनी आणि पक्षांची धावपळ वाढणार आहे.राज्यातील एकूण २५ जिल्हा परिषद व २८३ पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम ११ जानेवारीला जाहीर झाला आहे. विविध राजकीय पक्षांद्वारे अधिकृत उमेदवारांना पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी विहित नमुन्यात पत्र देण्यात येते. त्याला नमुना २ (ब) पत्र असे संबोधतात. हे पत्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या म्हणजेच छाननीच्या तारखेपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत देण्याची मुभा उमेदवारांना होती. ग्रामविकास विभागाने काढलेल्या व शासनाद्वारे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार आता हे पत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तारखेस दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक झाले आहे. राजकीय पक्षांना उमेदवारी यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना नमुना २ (ब) देण्याची घाई करावी लागणार आहे. >दोन टप्पे, दोन तारखापहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषद व १६५ पंचायत समितींसाठी निवडणुका होतील. त्यासाठी १ फेब्रुवारीला नमुना पत्र सादर करता येईल. दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समितींसाठी ६ फेबु्रवारीला नमुना पत्र देणे अनिवार्य आहे. नमुना पत्र न दिल्यास उमेदवार अपक्ष मानण्यात येईल.पक्षाच्या पत्रात हा उल्लेख महत्त्वाचाउमेदवाराने अर्जात तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे, त्याचा उल्लेख केला नसेल व त्यास एखाद्या पक्षाचा नमुना २ (ब) प्राप्त झाला, तरी तो पक्षाचा अधिकृत उमेदवार राहणार नाही.उमेदवाराने अर्जात जरी तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असल्याचा उल्लेख केला, तथापि त्यास पक्षाने नमुना २ (ब) दिला नाही, तर तो पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरणार नाही.