शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात राहणार आता महिलांचाच ‘अंमल’

By admin | Updated: October 29, 2014 00:44 IST

कामकाज पारदर्शक बनावे यासाठी येथील कामकाजाची संपूर्ण जबाबदारी महिला कॉन्स्टेबलच्या हाती

एकनाथ पाटील- कोल्हापूर --पोलीस ठाण्यातील वाढत्या लाचखोरीला आळा बसावा, प्रत्येक महिला कॉन्स्टेबल सक्षम बनावी, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक बनावे यासाठी येथील कामकाजाची संपूर्ण जबाबदारी महिला कॉन्स्टेबलच्या हाती सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत ठाणे अंमलदारांची भूमिका महिला पोलीस बजावताना दिसत आहेत.काही ठाणे अंमलदारांच्या अरेरावीच्या बोलण्याने अत्याचारग्रस्त महिला तक्रार देण्यास पुढे येत नव्हत्या. आता मात्र महिला ठाणे अंमलदारांपुढे त्या व्यथा मांडू शकतात. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या या निर्णयामुळे पोलीस दलात रुजू झाल्यापासून पहिल्यांदाच आम्हाला न्याय मिळाला असल्याची भावना महिला पोलिसांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात २९ पोलीस ठाणी असून, प्रत्येक पोलीस ठाण्याचा कार्यभार ठाणे अंमलदार सांभाळत असतात. पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक हा फक्त पोलीस ठाण्यावर नियंत्रण ठेवत असतो. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, ठकबाजी, फसवणूक, बलात्कार, गर्दी, मारामारी, बनावट नाणी, अपहरण, आत्महत्येचा प्रयत्न, विनयभंग, जुगार, मटका, आदी वेगवेगळे गुन्हे नेहमी प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. ही कामे ठाणे अंमलदार करीत असतात. बहुतांश पोलीस ठाण्यांचे कामकाज ढिम्म पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी पोलिसांमध्ये समन्वय राहावा, कामाची जबाबदारी समजावी, तसेच पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक व कार्यक्षमपणे चालावे यासाठी ठाण्यांच्या कारभाराची जबाबदारी महिला पोलिसांवर सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांचे दिवसभराचे कामकाज महिला पोलीस हाताळत आहेत. त्यांच्या मदतीला तीन पोलीस कर्मचारीही देण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिसांना वायरलेस कक्षामध्ये चोवीस तास ड्युटीसाठी बसविले जात असे. त्याचबरोबर काही महिला आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांची ड्युटी लावली जात असे. तक्रारी ऐकणे व त्या स्टेशन डायरीमध्ये दाखल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जात नसे. त्यामुळे गुन्हे कसे दाखल करतात, कोणत्या गुन्ह्यासाठी कोणते कलम लावले पाहिजे, याबाबत बहुतांश महिला पोलीस अनभिज्ञ आहेत. महिलांनीही सक्षमपणे पुढे येऊन पोलीस ठाण्याचे कामकाज चालवावे, हा उद्देश समोर ठेवून शर्मा यांनी पुरुषांबरोबर महिला पोलिसांनाही एक पाऊल पुढे टाकण्याची संधी दिली आहे. महिला अधिकारी नियुक्तीची घोषणा कालबाह्य गुन्ह्यांचा तपास किंवा त्याबाबतच्या मार्गदर्शनाचे अधिकार असलेल्या महासंचालक ते उपनिरीक्षक दर्जापर्यंतच्या महिला राज्यात अवघ्या १२४६ असून, महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे गुन्ह्यांची तक्रार ते न्यायालयात आरोपपत्र अशी सर्व कार्यवाही पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच केली जाते. महिलांना नोकरीत ३३ टक्केआरक्षणाचा नियम असला, तरी त्याची पोलीस दलात पूर्तता झालेली नाही. जिल्ह्यात एका तरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी महिलांची नियुक्ती केली जाईल, या माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या घोषणेला तीन वर्षे झाली तरी याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.