शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आता कोकण रेल्वे मार्गावर घातपाताचा प्रयत्न

By admin | Updated: February 14, 2017 20:04 IST

कणकवली तालुक्यातील खारेपाटण नजीकच्या चिंचवली येथे कोकण रेल्वेच्या रुळावर जॉगल प्लेट (लोखंडी) ठेवून घातपात

ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 14 -  कणकवली तालुक्यातील खारेपाटण नजीकच्या चिंचवली येथे कोकण रेल्वेच्या रुळावर जॉगल प्लेट (लोखंडी) ठेवून घातपात करण्याचा अज्ञाताचा प्रयत्न उघडकीस आला आहे.मात्र मालगाडीने ही प्लेट तुटल्यामुळे अनर्थ टळला आहे. ही घटना सोमवारी दुपारी २.५४ च्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेने कोकण रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली आहे.दरम्यान, रेल्वे प्रशासनाने याबाबत कणकवली पोलिसात याबाबत मंगळवारी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे अधिक वृत्त असे की, कोकण रेल्वे मार्गावर खारेपाटण चिंचवली नजिक सोमवारी दुपारी २.५४ च्या दरम्यान मुंबई-मंगलोर मालगाडी जात असता या मालगाडीचे चालक यू.व्ही.नाईक यांच्या ही प्लेट रूळावर ठेवल्याचे निदर्शनास आले. ही जॉगल प्लेट रेल्वे रुळावर ठेवली असल्याची माहिती ज्युनियर इंजिनियर गुरूदेव गवस यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानुसार गुरूदेव गवस यांनी रेल्वे रुळाची पाहणी केली असता या प्लेटचे मालगाडीने तुकडे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.या बाबतची माहिती वैभववाडी रेल्वे स्थानकाचे ज्युनियर इंजिनियर गुरूदेव धानू गवस (२४) यांनी मंगळवारी कणकवली पोलिसात दिली आहे. रेल्वेला अपघात करण्याच्या उद्देशाने कुणी तरी अज्ञाताने ही प्लेट रेल्वे रुळावर ठेवली होती. अज्ञाताविरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

  मोठा अनर्थ घडला असता कोकण रेल्वे प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून ही प्लेट मालगाडीने तुटली. जर एक्सप्रेस गाडी या वेळेला गेली असता तर मोठा अनर्थ घडला असता. कोकण रेल्वे मार्गावर चौकट कोकण रेल्वे मार्गावर घातपाताचा प्रयत्न मुंबई आणि परिसरात रेल्वे रूळावर लोखंडी रॉड टाकून रेल्वे अपघात घडविण्याच्या प्रयत्न गेले काही दिवस सुरू आहेत. तसा काहीसा प्रयत्न कोकण रेल्वे मार्गावर करण्याचा डाव सोमवारी उघडकीस आला. सुदैवाने मालगाडीच्या चालकाच्या प्रसंगावधनामुळे रॉड तुटून गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला.