शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाच गंभीर आजारांवर आता एकच डोस

By admin | Updated: November 23, 2015 00:40 IST

पेंटाव्हायलंट लस : आरोग्य विभागातर्फे आजपासून प्रारंभ; मोफत वाटप होणार

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर -पाच गंभीर आजारांच्या प्रतिबंधासाठी आता पेंटाव्हायलंट ही एकच लस दिली जाणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागातर्फे आज, सोमवारपासून सर्व जिल्हा, तालुका रुग्णालयांसह प्राथमिक आणि उपकेंद्रांत ही लस मोफत दिली जाणार आहे.डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात या आजारांच्या प्रतिबंधासाठी बाळांना दीड, अडीच, साडेतीन महिन्यांनी इंजेक्शनद्वारे त्रिगुणी लसीचा डोस दिला जातो. याशिवाय मेंदूज्वर आणि कावीळ या आजाराच्या प्रतिबंधाची लस स्वतंत्र इंजेक्शनद्वारे द्यावी लागत होती. त्यामुळे बाळाला एकूण सहावेळा इंजेक्शन टोचावे लागत असल्याने कोवळ्या शरीरावर इंजेक्शनने बाळाला खूप त्रास होत असतो. काही काळ गाठही उठते तर दोन ते तीन दिवस बाळ रडत असते.आता मात्र डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीळ, मेंदूज्वर या पाच आजारांच्या प्रतिबंधासाठी एकच पेंटाव्हायलंट लसची डोस दिली जाणार आहे. त्यामुळे किमान तीन इंजेक्शनपासून बाळाची सुटका झाली आहे. शासकीय रुग्णालयासह नियमित लसीकरणाच्या मोहिमेत ही लस बाळांना मोफत दिली जाणार आहे. केंद्र सरकारचा आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेने सन २०१३ मध्ये पेंटाव्हायलंट लस प्रत्येक राज्यात देण्याचा आदेश दिला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, पुडूचेरी, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू- काश्मीर, दिल्ली या राज्यातील आरोग्य विभागातर्फे शासकीय आणि खासगी रुग्णालयांतून ही लस दिली जात आहे. महाराष्ट्रात आज, सोमवारपासून ही लस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीन बाळांना प्रातिनिधिक स्वरूपात ही लस देऊन या मोहिमेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. पाच गंभीर आजारावर पेंटाव्हायलंट ही एकच लस आता शासकीय रुग्णालयांतून आणि शिबिरांतून मोफत दिली जाणार आहे. तीन इंजेक्शनद्वारे हे डोस दिले जातील. पूर्वी सहा इंजेक्शन द्यावी लागत होती. ‘पेंटाव्हायलंट’मुळे तीनवेळाच इंजेक्शन द्यावे लागते. - डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी