शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आता मुंबईच्या चकरा नाही...

By admin | Updated: October 30, 2014 00:51 IST

राज्य सरकारशी संबंधित कुठलेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबईत जाऊनही मुख्यमंत्री भेटतीलच याची खात्री नव्हती. गडचिरोली, मेघळाटसारख्या दुर्गम

विदर्भवासीयांच्या आशा पल्लवीत : नागपुरातच सुटणार प्रश्ननागपूर : राज्य सरकारशी संबंधित कुठलेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबईत जाऊनही मुख्यमंत्री भेटतीलच याची खात्री नव्हती. गडचिरोली, मेघळाटसारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना तर मुंबईला जाणे अधिकच गैरसोयीचे होते. आता मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यामुळे या सर्व अडचणी दूर होतील, विदर्भातील नागरिकांचे प्रश्न येथे नागपुरातच सुटतील, असा विश्वास विदर्भवासीयांना वाटत आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचे शासन दरबारी अनेक विषय प्रलंबित असतात. ते विषय निकाली काढण्यासाठी त्यांना बऱ्याच चकरा माराव्या लागतात. अनेकांची अक्षरश: दमछाक होते तर अनेकजण निराश होऊन विषय सोडून देतात. आता मात्र नागपूरचा मुख्यमंत्री झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. त्यांनी वेळोवेळी विधानसभेत विदर्भाच्या अनुशेषावर आवाज उठविला. विदर्भावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. रस्ते, वीज, पूल यासाह पायाभूत सुविधा देण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली. विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रातील प्रश्नांना त्यांनी हात घातला. आता त्यांच्याच हाती राज्याची सूत्रे आल्यामुळे विदर्भावर होणारा प्रशासकीय अन्याय थांबेल, नागरिकांची कामे होतील, विकासाला चालना मिळेल, अशी वैदर्भीयांना अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)नागपूरच्या घरीही वाढणार वर्दळफडणवीस २७६, त्रिकोणी पार्क येथील घरी असले की त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी असायची. आपल्या समस्या घेऊन मोठ्या संख्येने लोक त्यांच्याकडे यायचे. लोक येताना विनंती अर्ज, निवेदने घेऊन यायचे. त्यांना सकारात्मक आश्वासन मिळायचे. त्या सर्वच आश्वासनांची पूर्ती व्हायचीच असे नाही. कारण ते विरोधी पक्षात होते. ते निर्णय घेण्यासाठी सरकारला बाध्य करण्यासाठी प्रयत्न करू शकत होते, पण स्वत: निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यामुळे मर्यादा होत्या. आता ते स्वत: मुख्यमंत्री राहतील. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या गर्दीतील प्रत्येकालाच आपले काम, अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास असेल.