शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आता ‘आनंदी आनंद’!

By admin | Updated: June 3, 2017 05:39 IST

राज्यातील बळीराजा संपावर गेला असला, शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असली आणि कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अधिक

विशेष प्रतिनिधी/  लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील बळीराजा संपावर गेला असला, शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असली आणि कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अधिक असले, तरी राज्यातील जनता आनंदी राहावी, यासाठी सरकार आता स्वतंत्र आनंद विभाग स्थापन करणार असून, तशा हालचाली सुरू आहेत.भौतिक प्रगतीबरोबर मानसिक समाधान लाभणे तितकेच महत्त्वाचे असते. कोणतेही राष्ट्र असो की राज्य, संयुक्त राष्ट्र संघामार्फत त्या प्रदेशाच्या प्रगतीचे मूल्यमापन आता आनंद निर्देशांकानुसार केले जाते. नागरिकांचा आनंद हा केवळ भौतिक प्रगतीवर अवलंबून नसून त्यास सामाजिक, कौटुंबिक तसेच मानसिक आरोग्याचे परिमाण आवश्यक ठरते. याच्या माध्यमातून देशाची ओळख ही जागतिक पातळीवर अधिक आनंदी देश अशी होणे आवश्यक आहे. त्या साठीचाच एक भाग म्हणून राज्य शासन मदत व पुनर्वसन विभागांतर्गत आनंद विभाग स्थापन करणार आहे. त्या बाबतचा आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना आज करण्यात आली. मदत व पुनर्वसन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील. सामान्य प्रशासन विभाग, वित्त आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वा प्रधान सचिव, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान; मुंबई, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान; मुंबईचे प्रत्येकी एक सदस्य असतील. आनंद विभागासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी, तसेच यंत्रणेबाबतचा आकृतिबंद ही समिती निश्चित करेल. या विभागासाठी लागणारा निधी आणि क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा या बाबत आवश्यक त्या शिफारशीदेखील समिती करेल. समिती तिच्या पहिल्या बैठकीपासून तीन महिन्यांच्या आत अहवाल देईल. ‘आनंद’ कसा मोजला जातो...संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच २०१७ सालचा जागतिक आनंद अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार जगातील १५५ देशांमध्ये भारताचा १२२ वा क्रमांक आहे. मुळात आनंद ही संकल्पना अमूर्त स्वरूपाची असल्याने, त्यानुसार संपूर्ण देशाचे मानांकन ठरविणे ही अभिनव संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात आनंद या संकल्पनेचे गुणांकन ठेवण्यासाठी प्रशासन, संस्थात्मक रचना आणि नागरिकांच्या सामाजिक संस्था या प्रमुख घटकांचा विचार केला जातो. या घटकांच्या माध्यमातून नागरिकांना होणाऱ्या आनंदाचे परिमाण मोजून देशाचा आनंद निर्देशांक (हॅपिनेस इंडेक्स) ठरविला जातो. त्यावरून, ढोबळ राष्ट्रीय आनंद निर्देशांक मोजला जातो.