शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आता गीत भीमायन

By admin | Updated: May 21, 2017 00:35 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभाचे औचित्य साधून या महामानवाच्या जीवनावर आधारित

- राहुल रनाळकर। लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभाचे औचित्य साधून या महामानवाच्या जीवनावर आधारित ‘गीत भीमायन’ची निर्मिती करण्यात येत आहे. गीत भीमायनमध्ये तब्बल शंभर गाण्यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे प्रख्यात गायकानी गायलेली ही गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे. वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या गाण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक आहे. त्यातील शंभर गाणी ‘गीत भीमायन’साठी निवडण्यात आली आहेत. बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत प्रत्येक प्रसंग वामनदादांनी अलगदपणे गीतांसाठी उचलेले आहेत. वामनदादांच्या गाण्यांवर पीएचडी केलेल्या डॉ. संजय मोहोड यांनी या गाण्यांसाठी संयोजन केले आहे. ‘गीत भीमायन’ची संकल्पना सुरुवातीला मांडली ती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी. या विद्यापीठाकडूनही काहीतरी व्हायलाच हवे, असा विचार पुढे आला. त्यातून ‘गीत भीमायन’ची संकल्पना समोर आली. विद्यापीठाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांना गीत भीमायनच्या निमित्ताने दिग्गज गायकांबरोबर गाण्याची मोठी संधीही निर्माण झाली.प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांनी गायलेल्या ग. दि. माडगुळकरांच्या ‘गीत रामायणा’प्रमाणेच ‘गीत भीमायन’ देखील लोकप्रिय होईल, असा विश्वास डॉ. संजय मोहोड यांनी व्यक्त केला आहे.दिग्गज गायकांचे सूर‘गीत भीमायन’मधील २० गाणी आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत. यातील प्रत्येकी ५ गाणी सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती व रवींद्र साठे यांनी गायली आहेत. तर ४ गाणी शुभा जोशी आणि १ गाणं सावनी शेंडे यांनी गायले आहे. पुढच्या २० गाण्यांचे काम सुरू आहे. त्यात हरिहरन, साधना सरगम, शौनक अभिषेकी आणि आशा भोसले यांचा सहभाग असणार आहे.अर्थपूर्ण गाण्यांचा साजएकीने राहा, असं सांगताना वामनदादा म्हणतात, ‘सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा...’ या गीतातील एक कडव आहे - ‘नगरी, सातारी, कोकणी, मोगलाई सारी जुनी, अमरावती आणि चांदा एकतेने येथे नांदा...’ आता ही फक्त गावांची नावे नाहीत. ही त्याकाळी रिपब्लिकन पाटीर्ची असलेली शक्तीकेंद्रं आहेत. नगरी, सातारी, कोकणी म्हणजे नगरचे दादासाहेब रुपवते, सातारचे बी. सी. कांबळे, कोकणचे आर. डी. भंडारे, मोगलाई म्हणजे औरंगाबादचे बी. एस. मोरे, अमरावतीचे रा. सू. गवई, चंद्रपूरचे बॅरिस्टर खोब्रागडे ही अशी सगळी मंडळी दोन ओळींमध्ये वामनदादांनी गीतबद्ध केली आहेत.