पुणे : केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या जनधन योजनेचा लाभ आता कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही मिळणार आहे. कारागृहाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या पुढाकाराने येरवडा कारागृहातील ५०७ कैद्यांचे जनधन योजनेअंतर्गत महाराष्ट्र बँकेत खाते उघडण्यात आले आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून दोन लाखांपर्यंतच्या विम्याचा लाभही या कैद्यांना मिळणार आहे.कारागृह विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते कैद्यांना बँक पासबुकचे वितरण करण्यात आले. पाच वर्षांपासून ते जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांचे खाते उघडण्यात आले आहे. कारागृहात कैदी विविध वस्तू तयार करतात. त्यासाठी त्यांना पगार दिला जातो. या पगारातील काही रक्कम त्यांना या खात्यामध्ये ठेवता येईल. कैद्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. (प्रतिनिधी)नागपूर कारागृहामध्येही अशाच प्रकारे कैद्यांची खाती उघडण्यात येत आहेत. पुणे आणि नागपूर येथे राबवलेला हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यभरात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक
आता कैद्यांचेही जनधन खाते !
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST