शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

फूडमॉलवर आता अधिकृत थांबा

By admin | Updated: September 19, 2014 03:13 IST

मुंबई-ठाणो-पुणो मार्गावर धावणा:या शिवनेरी आणि अन्य एसटीच्या गाडय़ांना अनधिकृतपणो फूडमॉल आणि हॉटेलवर थांबा देण्यात येत होता.

मुंबई : मुंबई-ठाणो-पुणो मार्गावर धावणा:या शिवनेरी आणि अन्य एसटीच्या गाडय़ांना अनधिकृतपणो फूडमॉल आणि हॉटेलवर थांबा देण्यात येत होता. यात प्रवाशांची भरमसाठ लूट होत असल्याने याची दखल घेत एसटी महामंडळाने आता लवकरच  निविदा प्रक्रियेद्वारे उत्तम दर्जाच्या फूडमॉल किंवा हॉटेल चालकांची निवड करत अधिकृत थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यात चार फूडमॉल चालकांची निवड होणार आहे. 
मुबंई-पुणो मार्गावरील शिवनेरी आणि अन्य एसटी बसेस एक तास ते दीड तासात लोणावळ्यात पोहोचत आणि घाट उतरण्याआधी जुन्या मुंबई-पुणो मार्गावरून जाऊन काही अस्वच्छ फूडमॉलवर थांबत असत. या फूडमॉलवर येताना एसटी चालक लोणावळा येथील टोलही भरतात. यातून एसटी चालकांचे अर्थपूर्ण संबंध दिसूनही आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. एसटी महामंडळाकडून या मार्गावरील फूडमॉलबाबत दोन वर्षापूर्वी ठोस धोरण होते. एसटी महामंडळाकडे या मार्गावरून जाणा:या जवळपास 120 शिवनेरी आणि अन्य एसटी बसेस आहेत. यात प्रत्येक शिवनेरीमागे 120 रुपये आणि साध्या गाडीमागे 85 रुपये फूडमॉल चालक एसटीला देत होते. मात्र याचे कंत्रट दोन वर्षापूर्वी संपल्यानंतर या दोन वर्षात एसटीला साधारण 10 ते 12 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणो एसटीच्या चालक आणि वाहकांकडून परस्पर मुंबई-ठाणो-पुणो मार्गावरील फूडमॉलवर थांबा देण्यात येत असे. तसेच त्यामुळे एसटीचे डिङोल आणि टोलमुळे नुकसान होत होते. प्रवाशांचीही गैरसोय होत होती. या सर्व बाबी पाहता निविदा प्रक्रियेद्वारे या मार्गावरील चार फूडमॉल चालकांची निवड केली जाणार आहे.  (प्रतिनिधी)
 
मुंबई-पुणो मार्गावरील काही फूडमॉल आणि हॉटेलवर अनधिकृत थांबे दिले जात होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आता याबाबत निश्चित धोरण आखण्यात आले आहे. यात निविदेप्रक्रियेद्वारे चांगल्या फूडमॉल चालकांची निवड केली जाणार आहे. तसेच राज्यातील अन्य मार्गावरही अशा फूडमॉल चालक आणि हॉटेलची निवड केली जाईल, असे एसटी महामंडळाचे  महाव्यवस्थापक (वाहतूक) रत्नपारखी यांनी सांगितले.
 
प्रवाशांनी चालकांच्या अनधिकृत थांब्यांबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या. त्याची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच फूडमॉल चालक आणि हॉटेलच्या निवडीबाबत निश्चित धोरण आखण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांची लूट थांबणार आहे.