शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

.. आता मोबाईल फोनवर इंटरनेटशिवाय टीव्ही!

By admin | Updated: December 9, 2014 23:59 IST

दूरदर्शनतर्फे २0 चॅनल्सचे मोफत प्रसारण.

अकोला: मोबाईल फोनवर इंटरनेटशिवाय २0 चॅनल्सचे मोफत प्रसारण करण्याची योजना दूरदर्शनने आखली आहे. त्यानुसार साधारणत: वर्षभरात स्मार्टफोन वापरणार्‍या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.विदेशातील एका सरकारी मीडिया कंपनीच्या सहकार्याने प्रसार भारतीतर्फे ही योजना राबविण्यात येत आहे. मानवी जीवनास अन्न, वस्त्र व निवारा या तीन मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात जागतिक पातळीवर ज्ञान, आरोग्य व मनोरंजन या तीन गोष्टींची मानवी मूलभूत सुविधांमध्ये भर टाकण्यात आली आहे. जागतिक पातळीवर मनोरंजनाला महत्त्व देण्यात आले असून, त्यामुळेच मनोरंजन कक्षेचा विस्तार झाला आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे कल्पनाविलास मूर्त स्वरूपात येत असून, दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या मोबाईल फोनद्वारे मनोरंजनाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल आता दूरदर्शनच्या माध्यमातून होत आहेत. टेलिव्हिजन तंत्रज्ञानात सध्या डिश, केबल व अनॉलॉग एन्टेना हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. यात आता डिजिटल एन्टेनाची भर पडत आहे. पुढील वर्षात मोबाईल फोनसाठी दूरदर्शनतर्फे डिजिटल एन्टेनाद्वारे तब्बल २0 चॅनल्सचे प्रसारण केले जाणार आहे. सुरुवातीला मुंबई व दिल्ली येथे ही सेवा सुरू होत असून, त्यानंतर संपूर्ण भारतात तिचा विस्तार केला जाणार आहे. *डीव्हीबी-टी २दूरदर्शनतर्फे वापरण्यात येणार्‍या तंत्रज्ञानाचे नाव डिजिटल व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग टेरेस्ट्रियल लाईट असे आहे. डीव्हीबीचे सिग्नल्स दूरदर्शन केंद्राच्या टीव्ही टॉवरवरून प्रसारित करण्यात येतील. मोबाईल फोनवर टीव्ही पाहण्यास मोबाईल इंटरनेटची गरज राहणार नाही. डीव्हीबी प्रसारणाची सुविधा मोबाईल फोनवर घेण्यासाठी केवळ एका अँपची आवश्यकता असून, तेच अँप मोबाईल फोनवर टेलिव्हिजन प्रसारणाची सुविधा देण्याचे काम करणार आहे. *जगातील ४४ देशांमध्ये डीव्हीबीसद्यस्थितीत जगातील ४४ देश डीव्हीबी-टी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. भारतात या वर्षाअखेर स्मार्टफोन वापरणार्‍यांचा आकडा २२.५ कोटीवर जाण्याची शक्यता मोबाईल फोन उत्पादन कंपन्यांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. या स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय टीव्ही पाहणे शक्य होणार आहे.*र्जमनीच्या कंपनीशी करारडीव्हीबी-टी तंत्रज्ञानासाठी प्रसार भारतीने र्जमनीची शासकीय कंपनी डायचे वेलेसोबत करार केला आहे. डीव्हीबी-टी तंत्रज्ञानात ज्या बॅन्डविडथ्चा उपयोग करण्यात येणार आहे, त्याचाच उपयोग २0 एफएम रेडिओ चॅनल्स व इतर काही दूरसंचार सेवांसाठी करण्यात येणार आहे.