शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आता मिशन विधानसभा

By admin | Updated: June 26, 2014 01:02 IST

लोकसभा निवडणूक आटोपली. त्यानंतर लागलीच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातही निवडणुका झाल्या. मंगळवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता निवडणूक शाखेची

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : वर्षभर व्यस्तनागपूर : लोकसभा निवडणूक आटोपली. त्यानंतर लागलीच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातही निवडणुका झाल्या. मंगळवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता निवडणूक शाखेची आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. दीड महिन्यानंतर म्हणजे आॅगस्ट १५ नंतर या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.यंदाचे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून गेल्या सहा महिन्यापूर्वीपासून प्रशासन निवडणुकांच्या तयारीत व्यस्त आहे. मार्च महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली तरी त्यापूर्वीपासूनच मतदार याद्या अद्ययावत करण्यापासून इतर कामांपर्यंत प्रशासन कामाला लागले होते. १० एप्रिलला निवडणुका झाल्या. १६ मे रोजी निकाल जाहीर झाले. या निवडणुकीची आचारसंहिता संपत नाही तोच विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. आता राज्य विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ आॅगस्टनंतर केव्हाही निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.निवडणूक शाखेने निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या वेळी मतदार याद्यांमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ज्यांची नावे यादीतून वगळल्या गेली त्यांच्यासाठी विशेष मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्यावर आयोगाकडून पुन्हा एकदा मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर होईल. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत मतदारांना नावे नोंदवता येतील. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून यादीतील मृत, स्थानांतरित, दोन वेळा नावे अशी एकूण साडेपाच लाख नावे जिल्ह्याच्या मतदार यादीतून वगळण्यात आली होती. सध्या अशाच प्रकारची दीड लाखांवर नावे यादीत आहेत. मात्र ती थेट वगळली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.एकापाठोपाठ येणाऱ्या निवडणुका आणि त्यामुळे लागणाऱ्या आचारसंहितेमुळे विविध विकास कामांचाही खेळखंडोबा झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सलग तीन महिने प्रशासन ठप्प होते. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली. लोकसभेप्रमाणे ती जाचक नसली तरी सहाही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने त्यांना शासकीय बैठकीत सहभागी होता येत नव्हते. प्रशासनाकडे सरासरी दोन महिन्यांचा वेळ आहे. दरम्यान आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करावयाच्या कामांची लगीन घाई लोकप्रतिनिधींसोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागली आहे.(प्रतिनिधी)