शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

...आता गवतापासून मद्यनिर्मिती?

By admin | Updated: May 6, 2017 03:40 IST

गवतापासून मद्यनिर्मिती करण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्यासाठी येथील खासगी कंपनी आणि आगरकर इन्स्टिट्यूटमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गवतापासून मद्यनिर्मिती करण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्यासाठी येथील खासगी कंपनी आणि आगरकर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन सुरू झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच पुण्यामध्ये या संशोधकांसमवेत बैठक घेऊन चर्चाही केली होती. त्यादृष्टीकोनातून या पथदर्शी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. गवताची शेती केली जात नाही. ते‘अ‍ॅग्री वेस्ट’ म्हणून गणले जाते. गवतापासून बायोमास तयार होते. मात्र, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यातील बायोमास-सेल्यूलस नष्ट करुन त्याचे द्रवरुपात रुपांतरण कसे करता येईल, यावर खासगी कंपनीबरोबरच आगरकर इन्स्टिट्यूटमध्येही संशोधन सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. मक्याचे कणीस दाणे काढल्यानंतर काहीच उपयोगाचे होत नाही. त्यापासूनही अल्कोहोल तयार करण्याच्यादृष्टीनेचही संशोधन सुरू आहे. कंपनीच्या संशोधक आणि पदाधिकाऱ्यांची मंत्री बावनकुळे यांनी अलिकडेच भेट घेऊन व्यावसायिक अल्कोहोल परवाना देण्यासंदर्भात चर्चा केली. सीएसआर अंतर्गत या प्रकल्पाला शासन मान्यता देऊन सवलतही दिली जाण्याची शक्यता आहे. बीअर बनवण्यासाठी बार्ली १३० रुपये किलो दराने आयात केली जाते. पंजाब आणि हरयाणामधील उत्पादकांकडून आयात केल्यास ७० रुपये किलो असा दर पडतो. महाराष्ट्रामध्ये बार्लीचे उत्पादन घेण्यासंदर्भातही चर्चा सुरु असून एका स्वयंसेवी संस्थेने अकोल्यामध्ये हा प्रयोग सुरू केला आहे.आदिवासी आणि दुष्काळी भागामध्ये बार्ली पिक घेऊन त्यांना अधिक फायदा मिळू शकेल, असा विश्वास या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केला आहे. गवतापासून मद्यनिर्मिती करण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी पुण्यातील बैठकीमध्ये संशोधकांना सविस्तर सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांना फायदा मिळेल. हा पथदर्शी प्रकल्प असेल.- मोहन वर्दे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.