शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आता नेता भेटणार थेट मोबाईलवर

By admin | Updated: November 15, 2015 23:52 IST

नवीन अ‍ॅपचे अनावरण : नेते - मतदारांमधील दरी दूर करण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : अर्कानुम्झ एंटरप्रायझेसने आपल्या पहिल्या खास ‘डायरेक्टनेता’ या राजकीय मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले आहे. त्यातून राजकीय नेते आणि त्यांच्या मतदारसंघांमधील दरी भरुन काढण्यास मदत होईल. पंकज सावर्डेकर आणि प्रवीण रमेश काळे या संस्थापकांनी या अ‍ॅपची रचना पोहोचण्यास कठीण असलेल्या राजकारण्यांसोबत थेट फोन कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून जोडले जाण्यासाठी केली आहे.सामान्य माणूस आता पोहोचण्यास कठीण असलेल्या नेत्यांपर्यंत जास्त कार्यक्षमतेने पोहोचू शकतो आणि आपल्या समस्यांकडे तत्काळ लक्ष वेधून घेऊन सोडवून घेऊ शकतो. तसेच समस्येवर काम सुरु असताना त्याला नियमित अपडेट्सही मिळत राहतील. हे अ‍ॅप राजकारणी आणि मतदार यांच्यातील संवादात पारदर्शकता आणेल, जो जनता आणि नेता यांच्यातील संबंध दृढ करेल. या अ‍ॅपच्या मदतीने जनता (वापरकर्ते) अ‍ॅप कॉल आणि मेसेजच्या मदतीने आपल्या समस्या किंंवा चिंंता विचारु शकतात, ज्यासाठी त्यांना नेत्याकडून त्याच अ‍ॅपद्वारे पावती मिळेल, हे यात एक अतिरिक्त वैशिष्ट्यही आहे, जिथे सामान्य माणूस (वापरकर्ता) आपल्या नेत्यासोबत थोडक्यात परंतु मर्यादित चॅट करु शकेल आणि आपल्या प्रश्नांवर चर्चा तसेच उत्तर अत्यंत सोप्या पद्धतीने मिळवू शकेल. या अ‍ॅपचा युएसपी म्हणजे नेत्याला विचारण्यात आलेल्या केसेसबाबत वेळेत अहवाल मिळतील आणि केसच्या संपूर्ण प्रक्रियेवर ती सोडवण्यात येत असताना तो त्यावर लक्ष ठेवू शकेल. या अ‍ॅपच्या मदतीने कॉल करणे किंवा मेसेज करणे, मेसेजिंंग किंंवा कॉलिंंग अ‍ॅप्सच्या या युगात मोठी गोष्ट नाही. परंतु, एका राजकीय अ‍ॅपवर रिपोर्टिंग यंत्रणा असणे ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. ही वेबसाईट डायरेक्ट नेताशी जोडलेल्या नेत्यांच्या नियमिती कामगिरीचे अहवाल देईल. त्यामुळे सामान्य माणसाला नेत्याबाबत आणि त्याने आपल्या मतदारसंघात केलेल्या कामाबाबत माहिती मिळू शकेल. (प्रतिनिधी)या अ‍ॅपच्या मदतीने नेता आपल्या व्यग्र दिनक्रमात ढवळाढवळ न करता त्याच्या मतदारसंघासोबत दिवसाच्या कोणत्याही वेळी कुठूनही संपर्कात राहू शकतो. या अ‍ॅपमुळे नेत्यांवर अंकुश ठेवण्यातही मदत होणार आहे. नेते आपल्या मतदारांना फसवू शकणार नाहीत.याशिवाय नेत्यांपर्यंत पोहोचलेल्या शंका आणि त्यांची सोडवणूक यांचीही माहिती मिळू शकेल. लोकांच्या आणि राजकारण्यांच्या सध्याच्या गरजा लक्षात घेऊन या अ‍ॅपची रचना केली आहे, जे नेत्याच्या त्याच्या मतदारसंघाच्या गरजांनुसार कस्टमाईज करण्यात आले आहे.