शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

शवविच्छेदनासाठी आता न्यायवैद्यक विशेषज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 22:14 IST

ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनाची सुविधा असूनही अनेकदा तज्ज्ञ नसल्याचे कारण सांगून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवले जायचे

 ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13 -  ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनाची सुविधा असूनही अनेकदा तज्ज्ञ नसल्याचे कारण सांगून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवले जायचे. यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण वाढायचा, शिवाय मन:स्थिती चांगली नसताना मृताच्या नातेवाइकांना दूरवरून येण्या-जाण्याचा त्रास सहन करावा लागायचा. तसेच फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) विशेषज्ञ राहत नसल्याने अनेकवेळा न्यायलयीन प्रक्रियेत लागणारे पुरावे लक्षात घेता ते घेताना काळजी घेतली जात नव्हती. अखेर याची दखल सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतली. शवविच्छेदन होत असलेल्या प्रत्येक रुग्णालयात न्यायवैद्यकशास्त्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या २३ जिल्हा रुग्णालय व तीन सामान्य रुग्णालये असे एकूण २६ मोठ्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन केले जाते. यासाठी फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) विशेषज्ञ असणे आवश्यक असते. मात्र संपूर्ण राज्यात केवळ दोनच ठिकाणी न्यायवैद्यक विशेषज्ञ आहेत. यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या. विशेषज्ञ नसल्याने मृताच्या नातेवाईकांची धावपळ उडायची. न्यायालयीन प्रक्रियेतही अडचणी यायच्या. यामुळे जास्तीतजास्त न्यायवैद्यक अधिकाऱ्यांची सेवा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अखेर या संदर्भात नुकताच शासन निर्णय काढण्यात आला. यात अपघात वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील रुग्णालयांना मंजूर असलेल्या पदांपैकी एक पद  न्यायवैद्यक विशेषज्ञ या नावाने संबोधण्यात येण्याचे म्हटले आहे. या पदावर न्यायवैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका धारण केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषज्ञ तातडीने उपलब्ध होत नसल्यास या विषया संबंधीचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात यावे व अशा प्रशिक्षीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर पदावर नियुक्त करण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शवविच्छेदनात येणाऱ्या समस्या, मृताच्या नातेवाईकांची उडणारी तारांबळ कमी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, न्यायवैद्यकशास्त्राच्या पदव्युत्तर पदवीकडेही विद्यार्थी वळणाची शक्यता आहे.