शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांवर आता ड्रोनचा वॉच

By admin | Updated: January 16, 2017 03:00 IST

ठाणे महापालिकेने या परिसरातील फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची नजर ठेवण्याची योजना पुढे आणली आहे.

ठाणे : वारंवार कारवाई करूनही स्टेशन परिसरातील फेरीवाले हटत नसल्याने आता हतबल झालेल्या ठाणे महापालिकेने या परिसरातील फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची नजर ठेवण्याची योजना पुढे आणली आहे. परंतु, यापूर्वी सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, तीन शिफ्टमध्ये उपायुक्तांच्या नेमणुका करूनही या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. त्यात, या भागातील व्यापाऱ्यांनी या फेरीवाल्यांविरोधात पुन्हा एल्गार पुकारल्याने नाइलाजास्तव आयुक्तांना आता हा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्टेशन परिसर ते जांभळीनाका या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण केले. त्यानंतर, हा परिसर ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषितही केला. परंतु, रुंद झालेल्या रस्त्यांवर पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने येथील व्यापारीवर्ग हैराण झाला. तसेच पालिकाही त्यांच्यावर वारंवार कारवाई करीत आहे. सुरुवातीला त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हींची संकल्पना मांडली होती. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या एका संयुक्त पथकाची घोषणाही मध्यंतरी झाली होती. त्यानंतरही अतिक्र मणांचा विळखा कायम असल्याने आयुक्तांनी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना वार ठरवून या भागातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोणताही अधिकारी नेमून दिलेल्या दिवशी या भागात फिरकत नसल्याचे स्पष्ट होत आहे. पालिकेची पथके या भागात कारवाईसाठी तैनात असली तरी ते कारवाईसाठी येणार असल्याची खबर व्हॉट्सअ‍ॅपवरून फेरीवाल्यांना दिली जाते आणि काही वेळासाठी तेया भागातून गायब होतात, अशी तक्रार व्यापाऱ्यांनीच आयुक्तांकडे केली होती. कारवाईदरम्यान फेरीवाले पळून जात असतील, तर त्यावर ड्रोन कॅमेऱ्याने पाळत ठेवून कडक कारवाई करा, असे आदेश आयुक्तांनी शनिवारी बैठकीत दिले. (प्रतिनिधी)>ड्रोन कॅमेऱ्यावर नियंत्रण कुणाचे?सॅटीसच्या पुलाखाली जर फेरीवाले बसत असतील, तर तिथे ड्रोन कॅमेरे उडवणार कसे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याशिवाय, ड्रोन कॅमेरे वापरणाऱ्या तंत्रज्ञांना फेरीवाले आणि पालिकेचे भ्रष्ट कर्मचारी हाताशी धरणार नाहीत, याची शाश्वती काय? पालिकेची पथके कारवाईसाठी येतात, याची खबर जर त्यांना लागते, तर ड्रोन कॅमेऱ्यांची देखरेख त्यांना कळणार नाही का, असे सवाल उपस्थित होत आहेत. फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करूनही परिस्थिती जैसे थे होत असल्याने आता ड्रोन कितपत यशस्वी होते? याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष आहे.