शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईच्या १७ मुहूर्तांवर आता सराफांचे लक्ष

By admin | Updated: April 6, 2017 03:26 IST

सोन्याच्या देशभरातील आयातीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३०० टनांची घट झाली आहे

अनिकेत घमंडी,डोंबिवली- सोन्याच्या देशभरातील आयातीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३०० टनांची घट झाली आहे, अशी माहिती ‘आॅल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन असोसिएशन’चे विभागीय संचालक नितीन कदम यांनी ‘लोकमत’ला दिली.मागील वर्षी पाडव्यादरम्यान एक हजार १०० टन सोन्याची आयात झाली होती. यंदा मात्र तुलनेने २५०-३०० टनांची घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल-मेमध्ये लग्नसराईचे १७ मुहूर्त असून त्याकडे सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. त्यातील खरेदीवरच त्यांची भिस्त आहे. असे असले तरीही बाजारात अद्यापही मंदीच आहे. पाडव्यानिमित्ताने सोनेचांदीखरेदीत वाढ होईल, असे वाटले होते, पण तसे झालेले नसल्याचे कदम म्हणाले.सोन्याच्या प्रतितोळा दरामध्येही घट झाली आहे. सध्याचा २८ हजार ५०० रुपयांचा दर सन २०१४ मध्येही होता. त्यामुळे त्यात वाढ झालेली नाही. मध्यंतरीच्या काळात सोने ३३ हजारांपर्यंत गेले होते, पण आता एवढ्यात तरी उसळी मारणार नसल्याचे स्पष्ट चित्र असल्याचे ते म्हणाले. नोटाबंदीमुळे हा फटका बसला असून त्याचे परिणाम देशभरातील सराफ बाजारात दिसून येत आहेत. लग्नाचे एप्रिलमध्ये चार, मे महिन्यात १३ मुहूर्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून सोनेखरेदी होण्याची अपेक्षा आहे. पण, ग्राहकांमध्ये हवी तेवढी क्रयशक्ती दिसून येत नाही. मागणी तसा पुरवठा, या सिद्धान्तानुसार पाडवा, रामनवमी या महत्त्वाच्या सणउत्सवांना मागणी वधारलेली नाही. त्यामुळे १७ मुहूर्तांकडेच ठाणे-मुंबईमधील सुमारे तीन हजारांहून अधिक सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, असे असले तरीही फारसा फरक पडेल, असे दिसत नाही. >अन्यथा पाच महिने थांबासोनेचांदीचे अलंकार हे स्त्रीधन असते. त्यामुळे लग्नसराईनिमित्ताने जी खरेदी होईल तेवढीच. त्यानंतर, पाच महिने दसरादिवाळीपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये फारसा उत्साह नसल्याचे कदम म्हणाले.कारागिरांमध्येही निराशा सराफ बाजारात निराशा असून घडणावळीवर सूट यासह अन्य कोणत्याही योजना कशा राबवायच्या, हा पेच व्यावसायिकांसमोर आहे. त्याचा परिणाम कारागिरांवर होत असल्याने कुशल कारागिरांमध्येही नैराश्य आहे.