शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधण्यासाठी घरांवर नोटीस

By admin | Updated: August 28, 2016 23:58 IST

स्वच्छता अभियानातंर्गत रिसोड पंचायत समितीचा उपक्रम.

दादाराव गायकवाड वाशिम, दि. २८: शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधण्याची सूचना देण्याचा एक वेगळाच प्रयोग वाशिम जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीच्यावतीने राबविण्यात येत असून, या अंतर्गत शौचालय नसलेल्या घरांवर शौचालय बांधण्याची सूचना देणारी नोटीसच लावण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्यावतीने अत्यंत काटेकोरपणे स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक पंचायत समितीद्वारे वेगवेगळय़ा तर्‍हेने स्वच्छता उपक्रमाची अमंलबजावणी होत आहे. स्वच्छतेसाठी भेटीगाठी या अभियानात रिसोड तालुक्यात ४ हजार कुटुंबांच्या भेटी घेण्याचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले असून, यासाठी पंचायत समितीचे पदाधिकारी हिरीरीने पुढाकार घेत आहेत. गत २२ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत तालुक्यात आतापर्यंत ६00 कुटूंबाच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. त्याशिवाय पंचायत समितीने शौचालय नसलेल्या घरांवर शौचालय बांधण्याची सूचना देणारी नोटीस लावण्यास सुरुवात केली आहे. या नोटीसमध्ये आपण राहत असलेल्या घरी शौचालय बांधकाम केले नसून, आपण व आपला संपूर्ण परिवार उघड्यावर शौचास जाता. त्यामुळे आपण आपले व गावकर्‍यांचे आरोग्य आणि परिसरही दुषित करीत आहात. उघड्यावर शौचास बसणे हा दंडनिय अपराध असून, आपणाविरोधात मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ अंतर्गत सहा महिन्यांची कैद व बाराशे रुपये दंडाची कारवाई होऊ शकते.ह्णअशी स्पष्ट तंबीच दिली जात आहे. आतापर्यंत जवळपास ३00 घरांवर ही नोटीस लावण्यात आली असून, त्यावर रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि गटसमन्वयकाची स्वाक्षरीही आहे. या अभिनव उपक्रमामुळे रिसोड तालुक्यातील शौचालय नसलेल्या कुटुंबांनी धास्ती घेतली आहे. शाळाही पाठवित आहेत कुटूंबांना पत्र!हगणदरी मुक्तीच्या कामात तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळाही सरसावल्या असून ज्या घरी शौचालय नाही, त्या कुटूंब प्रमुखांच्या नावे पत्र पाठवून शौचालय बांधण्याची विनंती शाळांच्यावतीने करण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थी शौचालय बांधण्याची विनंती करणारे पत्र लिहून शौचालय नसलेल्या कुटूंबाना पोस्टाद्वारे पाठवित आहेत. या प्रयोगाची समाजातील सर्वच स्तरातून स्तूती करण्यात येत आहे.