शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दारुल कझाप्रकरणी नोटीस

By admin | Updated: June 16, 2016 02:45 IST

न्यायव्यस्थेला समांतर चालणारी मुस्लीम समाजाची ‘दारुल कझां’ च्या कामकाजाची चौकशी कोण करणार? दारुल कझामध्ये खरोखरच न्यायालयासारखे कामकाज चालते का, याची चौकशी

मुंबई : न्यायव्यस्थेला समांतर चालणारी मुस्लीम समाजाची ‘दारुल कझां’ च्या कामकाजाची चौकशी कोण करणार? दारुल कझामध्ये खरोखरच न्यायालयासारखे कामकाज चालते का, याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे? राज्य सरकाचा कोणता अधिकारी याची चौकशी करेल? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली मार्च महिन्यात केली होती. सरकारने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने बुधवारी उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांविरुद्ध अवमान नोटीस बजावली.न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना अवमान नोटीस बजावत ८ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.दारुल कझाला न्यायनिवाडा करण्याचा अधिकार नसतानाही याठिकाणी दिवाणी दावे आणि विवाहाच्या केसेस दाखल करण्यात येतात. न्यानिवाडा केला जातो आणि त्यावर शिक्कामोर्तबही केले जाते. दारुल कझा घटनेविरुद्ध आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दारुल कझा बंद करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका नाझीर नूर अली यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेनुसार, दारुल कझाची स्थापना ‘दि मुस्लीम पर्सनल लॉ (शरियत) आॅपल्किेशन अ‍ॅक्ट, १९३७’ आणि ‘दि डिसॉल्युशेन आॅफ मुस्लीम मॅरिज अ‍ॅक्ट १९३९’ यासाठी करण्यात आली होती. मात्र दारुल कझा मुख्य उद्देशापासून भरकटले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व दारुल कझा बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे.‘न्यायालयांना समातंर कामकाज दारुल कझा करत असतील तर हे गंभीर आहे. त्यामुळे याची चौकशी करणे आवश्यक आहे. राज्य सरकारचा कोणता अधिकारी याची चौकशी करेल?’ अशी विचारणा राज्य सरकारकडे करत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र तीन महिने उलटूनही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात न आल्याने अखेरीस खंडपीठाने मुख्य सचिवांवर अवमान नोटीस बजावली. (प्रतिनिधी)