शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी वृक्षतोड समितीत नाही

By admin | Updated: September 22, 2016 03:35 IST

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येईल आणि वृक्षतोडीची चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील वृक्षतोडीस वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सरसकट परवानगी दिल्यानंतर ठाण्यातील शिवसेना खासदार आणि आमदारांनी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेऊन याबाबत जाब विचारला असता, यासंदर्भात राज्य शासनाची परवानगी घेऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येईल आणि वृक्षतोडीची चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, महापालिकेच्याच अधिकाऱ्यांची समिती स्थापून प्रशासनाने लोकप्रतिनिधींना यापासून का दूर ठेवले, असा सवाल शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विचारला आहे. दिलेल्या आश्वासनानुसार लोकप्रतिनिधींना सामावून न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. सरनाईक यांनी पत्राद्वारे महापालिका हद्दीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींवर आपला विश्वास नसेल तर आपण नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीवर लोकप्रतिनिधींचा विश्वास कसा बसेल, असा प्रश्न अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना करून समितीमधील अधिकारी स्वत: या प्रकरणाशी संबंधित असल्याने प्रशासनाने मंजूर केलेल्या गोषवाऱ्याला आक्षेप घेणार नाहीत, असे म्हटले आहे.त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या समितीमधून सत्य बाहेर येणार नसून वृक्षप्रेमी ठाणेकरांना न्याय मिळणार नसल्याने जर लोकप्रतिनिधींवर विश्वास नसेल तर, महापालिकेने ठाणेभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले काही मानकरी, अथवा २५ वर्षे ठाणे महापालिकेत पत्रकारिता केलेले ज्येष्ठ पत्रकार किंवा प्रशासकीय सेवेतील अधिकारी हवे असतील, तर केंद्र वा राज्य शासनाच्या पर्यावरण खात्यातील अधिकाऱ्यांची समिती नेमावी, जेणेकरून समितीच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता येईल, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)>...तर शासनाकडे दाद अटी मान्य नसल्यास आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींवर विश्वास नसल्यास विकासकांशी असलेले आपले अतूट नाते जपण्यासाठी या वृक्षतोडीस सरसकट परवानगी मिळाल्यास नाइलाजास्तव आम्हाला राज्य शासनाकडे दाद मागावी लागेल.