शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्शन न दिल्याबद्दल महावितरणला २२,३०० रुपये दंड

By admin | Updated: February 7, 2016 01:06 IST

शेतीपंपाचे कनेक्शन मुदतीत (सहा आठवडे) न दिल्याबद्दल महावितरण कंपनीस आठवड्यास शंभर रुपये प्रमाणे २२,३०० रुपये दंड ठोठावला आहे. ‘महावितरण’च्याच ग्राहक संरक्षण फोरमने कृती

- विश्वास पाटील,  कोल्हापूरशेतीपंपाचे कनेक्शन मुदतीत (सहा आठवडे) न दिल्याबद्दल महावितरण कंपनीस आठवड्यास शंभर रुपये प्रमाणे २२,३०० रुपये दंड ठोठावला आहे. ‘महावितरण’च्याच ग्राहक संरक्षण फोरमने कृती मानके नियमन कायदा २०१४ च्या कलम आठनुसार हा दंड ठोठावला असून तो महिन्याच्या आत शेतकऱ्याला द्यावा, असे आदेश दिले आहेत. त्या शेतकऱ्याने सन १९९३ ला शेतीपंपाच्या कनेक्शनसाठी १९१० रुपये अनामत रक्कम भरली होती, ती ‘महावितरण’ने २०१५ ला परत केली. त्यामुळे या बारा वर्षांच्या कालावधीतील अनामत रकमेचे व्याजही द्यावे, असेही फोरमने म्हटले आहे.‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्याला तातडीने वीज कनेक्शन तर मिळालेच शिवाय आता अनामत रकमेचे व्याज व आणि विलंबाबद्दल दंडही मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील सदाशिव दिनकर निकम यांनी शेतीपंपाच्या कनेक्शनसाठी सन १९९३ ला अर्ज करून अनामत भरली; परंतु तब्बल २२ वर्षे हेलपाटे मारणाऱ्या निकम यांची फरफट ‘लोकमत’ने गतवर्षी १२ जूनच्या अंकात प्रसिद्ध केल्यावर ‘महावितरण’ची यंत्रणा हादरली व अवघ्या १८ दिवसांत त्यांना वीज कनेक्शन जोडून दिले. ‘लोकमत’चे वृत्त वाचून कोल्हापुरातील व्यवसायाने टेक्सटाईल इंजिनिअर असलेले सोमेश्वर रामचंद्र शिंगे यांनी निकम कुटुंबीयांची भेट घेत महावितरणच्या सातारा कार्यालयाकडे तक्रार केली. हा कालावधी ४ वर्षे ५ महिने होता. त्यातील सहा आठवडे वगळता २२३ आठवड्यांचे प्रति आठवडा २२ हजार ३०० रुपये दंड देण्याचा निकाल फोरमने दिला.