शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिसांवर खुनाचा नव्हे, बेकायदा अटकेचा ठपका

By admin | Updated: November 23, 2015 02:09 IST

अ‍ॅग्नेल्लो वल्दारिस (२४) याचा तुरुंगात असताना खून आणि लैंगिक छळ झाला नव्हता, असे केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) म्हटले.

डिप्पी वांकाणी,  मुंबईअ‍ॅग्नेल्लो वल्दारिस (२४) याचा तुरुंगात असताना खून आणि लैंगिक छळ झाला नव्हता, असे केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) म्हटले. १५ एप्रिल २०१४ रोजी वल्दारिससह तीन जणांना रेल्वे पोलिसांनी चोरी प्रकरणात ताब्यात घेतले होते. वल्दारिसच्या वडिलांनी अ‍ॅग्नेल्लोचा पोलिसांनी लैंगिक छळ करून त्याला धावत्या रेल्वेखाली फेकून दिल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते. अ‍ॅग्नेल्लोचा खून आणि त्या आधी लैंगिक छळ झाल्याचा आरोप चौकशीनंतर फेटाळला आहे. या प्रकरणात आरोपी ठरलेल्या १० रेल्वे पोलिसांना या अहवालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रेल्वे पोलिसांनी आपल्या दप्तरात वल्दारिसला अटक केल्याच्या वेळेची जी नोंद केली आहे, त्या आधी त्याला त्यांनी ताब्यात घेतले होते. आता सीबीआयने या प्रकरणात या दहा रेल्वे पोलिसांवर खटला भरण्यात यावा, अशी महाराष्ट्र सरकारकडे मंजुरी मागितली आहे. सीबीआयने त्यांचा अहवाल १७ नोव्हेंबर रोजी आमच्याकडे सादर केला असून, त्या दहा पोलीस अधिकाऱ्यांवर खटला चालवावा, असे म्हटले, अशी माहिती भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात लैंगिक छळ आणि खुनाची शक्यता फेटाळली आहे. पोलीस या प्रकरणात कोणत्याही प्रकारे दोषी आढळले आहेत का, असे विचारता, हा अधिकारी म्हणाला की, ‘पोलिसांनी वल्दारिसला अटक केल्याची जी वेळ दप्तरात नोंद केली आहे, त्याच्या आधी १० तास त्यांनी त्याला ताब्यात घेतले होते, असे पोलिसांनी सांगितले. ‘यावरून त्याला बेकायदेशीरपणे स्थानबद्ध केले होते, एवढेच दिसते. आम्ही हा सीबीआयचा अहवाल पुढे पाठविणार असून, खटला चालविण्याची परवानगी देण्याचा अधिकार सरकारला आहे.’‘अ‍ॅग्नेल्लो वल्दारिसला आम्ही १८ एप्रिल २०१४ रोजी घेऊन जात असताना, त्याने पळून जाण्याच्या उद्देशाने रेल्वेच्या रुळांवर उडी मारली, परंतु तो रेल्वेखाली चिरडला गेला, असा दावा पोलिसांनी केला होता. त्याच्या वडिलांनी मात्र पोलिसांनी त्याचा लैंगिक छळ करून त्याला धावत्या रेल्वेखाली फेकले, असा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सुरुवातीला हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविले होते. त्यानंतर राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) आणि नंतर पोलीस पुरावे ‘तयार’ करीत असल्याचे सांगून प्रकरण १७ जून रोजी सीबीआयकडे सोपविले होते.